संघाची एंट्री होताच योगी अन् मौर्य यांनी अस्त्रे म्यान करुन घेतली गळाभेट

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, भाजपमधील मतभेद वाढू लागले आहेत.
keshav prasad maurya meets yogi adityanath and rss top brass
keshav prasad maurya meets yogi adityanath and rss top brass

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुढील वर्षी विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत असून, भाजपमधील मतभेद वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबद्दल पक्षात नाराजी वाढत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या (Keshav Prasad Maurya) घरी हजेरी लावली. या दिलजमाईचा सूत्रधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे (RSS), अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या मेजवानीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे आणि सरसहकार्यवाह कृष्ण गोपाल यांची उपस्थिती होती. या दोघांच्या उपस्थितीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश भाजपमधील अंतर्गत बाबीत संघाने हस्तक्षेप करण्यास सुरवात केली आहे. पक्षांतर्गत मतभेद संपवण्यासाठी संघाने काही दिवसांपूर्वी राज्यातील नेत्यांशी चर्चाही केली होती. आताची योगी आणि मौर्य यांची दिलजमाई हा त्याचात भाग आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. याचबरोबर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. अनेक नेते उघडपणे योगींच्या विरोधात बोलू लागले आहेत. पक्षात दिवसेंदिवस वाद वाढत आहेत. यातच कोरोना संकट हाताळण्यातील चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. त्यामुळे संघाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल. 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हा संघपरिवाराने राजकीयदृष्ट्या प्राधान्यक्रमावरील विषय ठेवला आहे. या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नुकतीच महत्वाची ऑनलाइन बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती होती. 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, राज्यातील जनतेत सरकारबद्दल असलेल्या नाराजीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा येईल, अशी चर्चा होती. परंतु, योगींना बदलण्यास पक्षाने नकार दिला आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनाही बदलण्यात येणार नाही. या ऐवजी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे येतील. उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे समोर ठेवून त्यांची निवड होईल, असे सूत्रांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com