धोका वाढतोय...कोरोना लस घेतलेले तब्बल 40 हजार जण पॉझिटिव्ह

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले तब्बल 40 हजार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
in kerala 40 thousand found covid19 positive after taking vacccine
in kerala 40 thousand found covid19 positive after taking vacccine

नवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असले तरी कोरोना लस घेतलेले तब्बल 40 हजार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळमध्ये हा प्रकार घडला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ञ व्यक्त करीत आहेत. यातच केरळमध्ये कोरोना लस घेतलेले 40 हजार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी पाठवण्यास केरळ सरकारला सांगितले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये एका कोरोना रुग्णातील विषाणूचा नमुना घेऊन इतर रुग्णांतील विषाणूशी त्याची तुलना केली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लसीकरणामुळे कोरोना विषाणूपासून बचावाची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असताना त्यांना कोरोनाची लागण होणे चिंतेची बाब मानली जाते आहे. विषाणू म्युटेट झाल्यामुळे तो लशीला दाद देत नसल्याची शक्यताही आहे. अतिशय वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारच्या विषाणूमुळे हा संसर्ग झाल्याचेही अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
केरळमध्ये मागील काही आठवड्यांपासून दररोज सुमारे 20 हजारो कोरोना रुग्ण आढळत आहेत. काल मात्र, यात काहीशी घसरण झाली होती. काल 13 हजार 49 रुग्ण सापडले होते तर 105 मृत्यू झाले. आज राज्यात कोरोनाचे 21 हजार 119 रुग्ण सापडले असून, 152 जणांचा मृत्यू झाला आहे.  

जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे.  आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com