येडियुरप्पांच्या जागी कोण? राज्यातील भाजपचा बडा नेता दिल्लीत दाखल

कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे बडे नेतेदिल्लीत दाखल झाले आहेत.
karnataka minister murugesh nirani reach delhi to meet bjp high command
karnataka minister murugesh nirani reach delhi to meet bjp high command

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे (BJP) बडे नेते मंत्री मुरुगेश निरानी (Murugesh Nirani) हे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत. त्यामुळे निरानी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जाऊ शकते, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. 

निरानी हे कालच दिल्लीत दाखल झाले आहेत. निरानी यांच्यासह त्यांच्या निकटर्तीयांनी या भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. निरानी यांचे निकटवर्ती ते दिल्लीला गेल्याचे कबूल करीत असले तरी ते खासगी दौऱ्यावर गेल्याचे सांगत आहेत. निरानी हे येडियुरप्पांप्रमाणेच लिंगायत समाजाचे आहेत. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून, त्यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस सी.टी.रवी, गृहमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचीही नावे आघाडीवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येडियुरप्पांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड बंड पुकारले आहे. येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र हे 'सुपरसीएम' असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत आहेत. नुकतीच विजयेंद्र यांनी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होते. यामुळे येडियुरप्पांचे उत्तराधिकारी विजयेंद्र ठरतील, या  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेने जोर पकडला आहे. 

येडियुरप्पांना हे राज्यातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडू नये यासाठी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाला उघड इशारा दिला होता. याचबरोबर लिंगायत समाजाच्या काँग्रेस आमदारांनाही भाजपला इशारा दिला होता. यामुळे येडियुरप्पांच्या जागी लिंगायत नेताच मुख्यमंत्री बनावा, असा आग्रह विजयेंद्र यांनी पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हीच भूमिका घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. येडियुरप्पांना हटवून इतर समाजातील नेता मुख्यमंत्री बनवल्यास भाजपचा हा हक्काचा मतदार दुरावला जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून लिंगायत नेताच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com