पाच दिवसांत चार वेळा मंत्र्यांची खाती बदलण्याचा मुख्यमंत्र्यांनी केला विक्रम तरीही बंडाळी कायम

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नुकताच मंत्रिमंडळ विस्तार केला होता. यावरुन कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
karnataka cm yediyurappa makes fourth reshuffle in cabinet in last five days
karnataka cm yediyurappa makes fourth reshuffle in cabinet in last five days

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सात आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली होती. या मंत्रिमंडळ विस्तारावरुन आधी मोठा गदारोळ झाला होता. आता खातेवाटपावरुन वाद झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांत चार वेळा मंत्र्यांचा खातेबदल करण्याचा विक्रम करुनही नाराजी कायम असल्याचे समोर आले आहे. 

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी जाहीर केला होता. एम.टी.बी. नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांचा नुकताच शपधविधी झाला होता.   

मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खातेवाटप जाहीर केले होते. त्यानंतर नाराजीमुळे त्यांना 24 तासांत मंत्र्यांचा खातेबदल करावा लागला होता. तरीही नाराजी कायम होती. मागील पाच दिवसांत चार वेळा खातेबदल करण्यात आला आहे. येडियुरप्पांनी एक प्रकारे खातेबदलाचा विक्रमच केला आहे. यात काही मंत्र्यांकडील मोठी खाती काढून त्यांना छोटी खाती देण्यात आली आहे. यामुळे अनेक मंत्र्यांची नाराजी कायम आहे. 

येडियुरप्पांनी खातेबदल करताना मंत्र्यांना विचारात घेतले नव्हते. यामुळे ही नाराजी असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावंतांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री मधुस्वामी आणि आनंदसिंह हे नाराज होते. मधुस्वामींना हवे ते खाते मिळाले आहे. आनंदसिंह यांना पुढील खातेबदलात योग्य खाते देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरू झाला होता. भाजपच्या काही आमदारांनी उघड बंडाची भाषा सुरू केली आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे आणि पैसे घेऊन मंत्रिपदाचे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही झाला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com