कर्नाटकचा तिढा सुटला; जुन्या-नव्या चेहऱ्यांसह 29 मंत्र्यांचा आज शपथविधी

मंत्रिमंडळाची यादी घेऊन तीन दिवसांपासून मुख्यमंत्रीबोम्मई दिल्लीत होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी यादीला हिरवा कंदील दिला आहे.
in karnataka 29 ministers will take oath today says cm bommai
in karnataka 29 ministers will take oath today says cm bommai

नवी दिल्ली : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे दिल्लीत (Delhi) ठाण मांडून होते. कर्नाटकातील मंत्रिमंडळ स्थापनेचा (Cabinet) तिढा निर्माण झाला होता. मंत्रिमंडळाची यादी घेऊन तीन दिवसांपासून बोम्मई दिल्लीत होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी यादीला हिरवा कंदील दिला आहे. आज दुपारी 29 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.  

आज दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी 29 मंत्र्यांच्या शपथविधी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात येणार असल्याचे संकेत बोम्मई यांनी दिले आहेत. याबाबतची अधिसूचना राजभवनाने काढली आहे. राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे नवीन मंत्र्यांनी शपथ देतील. 

बोम्मई हे 1 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाले होते. ते मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले होते. त्यांनी कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंह यांची भेट घेतली होती. बोम्मई यांनी 2 जुलैला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली होती. त्यावेळी बोम्मई यांनी म्हटले होते की, मी मंत्रिमंडळाच्या 2 ते 3 याद्या पक्षाच्या अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष अंतिम यादी तयार करतील. यानंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांच्याशी चर्चा करुन मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख निश्चित होईल. 

येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. तसेच बोम्मई हे येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळं बोम्मई यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. बोम्मई यांच्या निवडीत येडियुरप्पा यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही येडियुरप्पा यांचाच वरचष्मा राहील, असे बोलले जाते. बोम्मई हे आधीच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. तसेच त्यांच्याकडं कायदा, संसदीय कार्य ही खातीही होती. 61 वर्षांचे बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे वर्चस्व विचारात घेऊन भाजपने याच समाजातील बोम्मई यांना पुढे आणले आहे. 

बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पक्षातील वाटचाल सुरू झाली. ते व्यवसायाने अभियंते असून दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार तर तिन वेळा शिगांव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहे. कर्नाटक विधीमंडळात पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com