'चंपा' नावाने लोकप्रिय असलेले लेखक चंद्रशेखर पाटील यांचे निधन

कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पाटील यांनी पुरस्कार वापसीची घोषणा केली होती.
'चंपा' नावाने लोकप्रिय असलेले लेखक चंद्रशेखर पाटील यांचे निधन
Chandrashekhar PatilSarkarnama

बेंगळुरू : प्रसिध्द कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर पाटील (Chandrashekhar Patil) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बेंगळुरू येथे निधन झाले. 'चंपा' अशी ओळख असलेले पाटील 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्तेनंतर पाटील यांनी पुरस्कार परत देण्याची घोषणा केली होती.

पाटील यांचा जन्म हावेरी जिल्ह्यातील हत्तीमत्तूर येथे 1939 मध्ये झाला होता. धारवाडमधील अखिल कर्नाटक (Karnataka) केंद्र कृषकम समितीचे सरचिटणीस असताना गोकाक चळवळीला प्रेरणा देण्यात पाटील यांचा मोठा सहभाग होता. हा काळ 1980 ते 83 चा होता. नोव्हेंबर 2004 ते 2008 या कालावधीत त्यांनी कन्नड साहित्य सभेचे अध्यक्षपदही भूषवले.

Chandrashekhar Patil
कोरोनाबाधित रुग्णांसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; जाणून घ्या सविस्तर

इंटर-थिएटर कोलिशन यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी नाट्य क्षेत्राचीही सेवा केली. 1970 च्या सांस्कृतिक चळवळींमध्येही त्यांचा मोठा वाटा होता. कर्नाटक सरकारसह विविध संस्था-संघटनांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मुरुघा मठाच्या बसव केंद्रातर्फे त्यांना 2018 मध्ये बसवश्री पुरस्कारही देण्यात आला आहे. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पाटील यांनी कर्नाटक सरकारचा पुरस्कार परत देण्याची घोषणा केली होती.

कन्नडमधील पुरोगामी साहित्यिक चळवळ म्हणून प्रसिध्द असलेल्या बंड्या चळवळीतही पाटील यांचा महत्वाचा वाटा होता. त्याचप्रमाणे गोकाक आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीचे आंदोलन, शेतकरी आंदोलन अनेक चळवळीमंध्येही त्यांचा सक्रीय सहभाग होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.