काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष? कार्यकारी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक 16 ऑक्टोबरला होत आहे.
Priyanka, Rahul and Sonia Gandhi
Priyanka, Rahul and Sonia Gandhi File Photo

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा (president) तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक 16 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची चिन्हे आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने काँग्रेसने आता नवीन पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक 16 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता होणार आहे. दिल्लीतील अकबर रोडवरील पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होईल. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनेच्या निवडणुका यावर चर्चा होईल. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पक्षातील बंडखोरांच्या जी-23 गटाचे नेते कपिल सिब्बल यांनी संघटनात्मक निवणुकांची मागणी केली होती.

पंजाबमधील पक्षांतर्गत वादानंतर काँग्रेसमधील फेरबदलांसाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारा जी-23 हा बंडखोरांचा गट पुन्हा सक्रिय झाला आहे. या गटाचे नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की, काँग्रेसला सध्या निडलेला अध्यक्षच नाही. मग निर्णय कोण घेतेय हेच आम्हाला कळत नाही. लोक पक्ष सोडून का जात आहेत? आपणच आता आपली चूक पाहायला हवी. तातडीने काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावावी. पक्षाच्या स्थितीवर चर्चा ही व्हायलाच हवी. आम्ही पक्षाची विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही. काँग्रेसचे दुर्दैव म्हणजे नेतृत्वाच्या जवळचे नेते पक्ष सोडून जात आहेत आणि नेतृत्वाच्या जवळ नसलेले तर पक्षात कायम आहेत.

Priyanka, Rahul and Sonia Gandhi
मुख्यमंत्र्यांचे पद जाताच 'पीए' बनला बसचा कंडक्टर कम ड्रायव्हर!

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सुमारे दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जून महिन्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले होते.

Priyanka, Rahul and Sonia Gandhi
भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर; माजी मुख्यमंत्री अडचणीत आले अन् आमदार आनंदले

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com