अखेर चौथा जामीन मिळाला अन् लालूंच्या सुटकेचा मार्ग झाला मोकळा

लालू हे सध्या चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
jharkhand high court granted bail to lalu prasad yadav in fodder scam
jharkhand high court granted bail to lalu prasad yadav in fodder scam

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंतानजक असून, त्यांच्यावर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार सुरू आहेत. झारखंड उच्च न्यायालयाने लालूंना आज चारा गैरव्यवहारातील एका प्रकरणात जामीन मंजूर केला. लालूंना याआधी चारपैकी तीन प्रकरणांमध्ये जामीन मिळाला होता. आता चौथ्या प्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

लालूंच्या जामिनावर आज झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने लालूंचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. चारा गैरव्यवहारातील चारपैकी तीन प्रकरणांमध्ये लालूंना आधीच जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. लालू हे सध्या रुग्णालयात असून, रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर ते घरी परततील. 72 वर्षीय लालू यांना शिक्षा झाल्यापासून डिसेंबर 2017 पासून ते कारागृहात आहेत. परंतु, शिक्षा झाल्यापासून बहुतांश काळ ते रुग्णालयातच आहेत. 

लालू हे सध्या चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. लालूंची तब्येत 23 जानेवारीला आणखी ढासळल्याने त्यांना 'एम्स'मध्ये हलवण्याचा  निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर त्या दिवशी सायंकाळी लालूंना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील 'एम्स'मध्ये हलवण्यात आले होते. लालूंना 'एम्स'मधील 'कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर'च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. लालूंसोबत त्यांच्या कन्या मिसा भारती या आहेत. लालूंना तेथे दाखल केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. 

लालूंवर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल नुकताच लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही. लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. 

चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com