आम्हीही असंच बोललो असतो तर आतापर्यंत...उपेंद्र कुशवाह यांचा भाजपला इशारा

भाजपच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. यावरुन राज्यातील महाआघातील बिघाडी समोर आली आहे.
jdu leader upendra kushwaha blames bjp for discord in government
jdu leader upendra kushwaha blames bjp for discord in government

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार सत्तेवर आहे. मात्र, भाजपच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. यावरुन माजी केंद्रीय मंत्री व जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी भाजपला नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. यावरुन राज्यातील महाआघातील बिघाडी समोर आली आहे. 

मागील काही काळापासून भाजपचे नेते नितीशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. याला जेडीयूचे नेतेही उत्तर देऊ लागल्याने सत्ताधारी आघाडीत जुंपल्याचे चित्र आता अनेक वेळा दिसू लागले आहेत. यातच आता भाजपचे आमदार टुन्ना पांडे यांनी नितीशकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितीशकुमार हे केवळ परिस्थितीमुळे बनलेले मुख्यमंत्री बनले असून, ते माझे नेते नाहीत. माजी खासदार शहाबुद्दीन यांना खरे बोलण्याची शिक्षा मिळाली होती. महाआघाडीचा माझा काही संबंध नाही. मी केवळ भाजपचा नेता आहे. 

यावर जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी भाजप नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. कुशवाह यांनी ट्विट केले असून, त्यात त्यांनी संजय जयस्वाल यांना टॅग केले आहे. जयस्वाल हे भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष आहेत. यात त्यांनी भाजपला सूचक इशाराही दिला आहे. कुशवाह यांनी म्हटले आहे की, संजय जयस्वालजी हे विधान तुमच्यापर्यंतही पोचले असेल. असे विधान जर एखाद्या जेडीयू नेत्याने भाजप अथवा भाजपच्या नेत्याबाबत केले असते तर आतापर्यंत... 

कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार 
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते. आता मात्र, भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. 

अरुणाचलमध्ये भाजपकडून विश्वासघात 
अरूणाचलमध्ये जेडीयूचे सात आमदार होते. यातीस सहा आमदारांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा केला होता. अरुणाचलमधील 60 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत जेडीयूचा केवळ एक आमदार उरला आहे. यामुळे पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचा एक आमदार पकडून भाजपचे संख्याबळ आता 48 वर गेले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com