पप्पू यादव प्रकरणात नितीशकुमार एकाकी; स्वपक्षासह भाजप अन् घटक पक्ष गेले विरोधात

माजी खासदार पप्पू यादव यांच्या अटकेवरुन बिहारमधील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर नितीशकुमार एकटे पडले आहेत.
jdu and other alliance parties target nitish kumar over pappu yadav arrest
jdu and other alliance parties target nitish kumar over pappu yadav arrest

नवी दिल्ली : जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांना अटक करण्यात आली आहे. यावरुन बिहारचे (Bihar)  मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) एकटे पडल्याचे चित्र आहे. त्यांच्याच संयुक्त जनता दलासह (JDU) सरकारमधील भाजप (BJP) आणि इतर घटक पक्षांतील नेत्यांनी या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. यामुळे यादव यांना अटक करणे मुख्यमंत्र्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. 

पप्पू यादव यांना अटक करण्यात आल्यानंतर प्रथमच जेडीयूतील नेत्यांची नाराजी समोर आली आहे. जेडीयूचे माजी खासदार व नितीशकुमारांचे निकटवर्ती मानले जाणारे मोनाजिर हसन यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पप्पू यादव यांना अटक करण्याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमीच आहे. ते गरीबांचे तारणहार म्हणून काम करीत आहे. खरेतर छपराचे जिल्हाधिकारी आणि भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांना अटक व्हायला हवी होती. 

जेडीयूचे आणखी एक नेता विजयेंद्र यादव यांनीही या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले की, पप्पू यादव यांची अटक चुकीची आहे. मानवतेच्या आधारावर राजीव प्रताप रुडी यांना एक दिवसही खासदार राहण्याचा अधिकार नाही. आता मानवतेच्या आधारावर सरकारने पप्पू यादव यांची सुटका करावी. याचबरोबर या रुग्णवाहिका प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि खासदारांचा राजीनामा घ्यावा. 

या प्रकरणी भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. पप्पू यांना अटक होणे ही बाब दुर्दैवी आहे. त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भाजपचे आमदार रजनीश कुमार यांनी केली. सरकारमधील घटक पक्ष विकासशील इन्सान पार्टीनेही याचा निषेध करीत या कारवाईला विरोध केला आहे. याचबरोबर दुसरा घटक पक्ष हिंदुस्तान आवामी महजनेही या कारवाईला विरोध केला आहे. यामुळे पप्पू यादव यांच्यावरील कारवाईवरुन नितीशकुमार एकटे पडल्याचे चित्र आहे. त्यांच्या जेडीयूसह भाजप आणि इतर घटक पक्षांनी विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर समाजमाध्यमातूनही या प्रकरणी सरकार टीकेचे धनी बनले आहे. 

बिहारमधील सारण येथील भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या रुग्णवाहिका पडून आहेत. त्यांनी खासदार निधीतून खरेदी केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. रुडी यांच्या मालकीच्या जागेवर या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. बिहारमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याचे पप्पू यादव यांनी समोर आणले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com