भाजपने, राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढा धसका का घेतला?

काल परवा एनसीबीच्या रेडमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते.
भाजपने, राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढा धसका का घेतला?
ncp, bjpsarkarnama

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी बुधवारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने छाड टाकली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंच पाटील यांनी भाजपवर टीका केली.

ncp, bjp
अजितदादा कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत

पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्या नेत्यांचे नाव घेतात, त्यानंतर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीयाची धाड पडते. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपचे आहे. यात काहीच शंका नाही. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढा धसका का घेतला आहे? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना असाच त्रास दिला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला.

ncp, bjp
लखीमपूर हिंसेवरून लक्ष वळवण्यासाठीच कारखान्यांवर धाडी!

आमचे सर्व नेते निर्दोष आहेत. गैरव्यवहार त्यांनी केलेला नसताना केवळ धाडसत्रं करून त्यांना बदनाम केले जात आहे. काल परवा एनसीबीच्या रेडमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते. देशातील सर्व एजन्सी भाजप चालवत आहे. सरकार चालवत नाही, असा आरोप पाटील यांनी केला. विरोधकांना बदनाम करणे, नामोहरण करणे हाच उद्देश आहे, असे पाटील म्हणाले. आयकर विभागाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी ती कारखान्यांना विचारायला हवी होती. त्यांना माहिती दिली असती. मात्र, धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची.

Related Stories

No stories found.