डॉ. नारळीकर घडवणार इतिहास; साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्रथमच विज्ञान लेखकाला

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत नारळीकरांची निवड झाली आहे.
jayant naralikar elected as president of akhil bhartiya marathi sahitya sammelan
jayant naralikar elected as president of akhil bhartiya marathi sahitya sammelan

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. संमेलनाच्या इतिहास पहिल्यांदा खगोलशास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान लेखकांना अध्यक्षपद मिळाले. 

संमेलनाध्यक्षपदासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि घटक व संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आज झाली. त्यानंतर संमेलन कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. नाशिकमध्ये दीड दशकानंतर होत असलेले साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च या कालावधीत होत आहे. 

ठाले-पाटील म्हणाले की, संमेलनाध्यक्षपदाची निवड एकमताने होऊ शकली नाही. डॉ. नारळीकर, भारत सासणे, प्राचार्य डॉ. जर्नादन वाघमारे, विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके, डॉ. रामचंद्र देखणे, नाशिकचे मनोहर शहाणे अशा सहा नावांचा संमेलनाध्यक्षपदासाठी विचार करण्यात आला. संमेलनाध्यक्षपदाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्‍नासंबंधीही चर्चा झाली. त्यातून बहुमताने संमेलनाध्यक्षांची निवड झाली.

ठाले-पाटील म्हणाले की, डॉ. नारळीकर यांच्या अनुषंगाने पत्नी मंगलाताई यांच्या पत्रातील दोन कोट अडचणीचे होते. त्यावर दीर्घ काळ चर्चा झाल्याने निवड प्रक्रियेला वेळ लागला. संमेलनाध्यक्षांनी तिन्ही दिवस उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यांनी साहित्यिक आणि रसिकांमध्ये मिसळावे, अशी भूमिका बैठकीत मांडण्या आली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने डॉ. नारळीकर यांच्या सहीचे संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे ते तीन दिवस संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. 

संमेलनाच्या उदघाटनासाठी साहित्यिकांनाच बोलावले जाईल, असे सांगून ठाले-पाटील म्हणाले की, की राजकारण्यांना साहित्य संमेलन वर्ज्य नाही. त्यांनाही साहित्याबद्दल आस्था आहे. ते रसिक आहेत. ते संमेलनाला येऊ शकतात आणि त्यात सहभागी होऊ शकतात. परंतु, मराठीत मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या हातून उदघाटन करण्यास गेल्या वर्षीपासून सुरवात केली आहे. त्याप्रमाणे नाशिकमधील साहित्य संमेलनाचे उदघाटन लेखक अथवा लेखिकांच्या हस्ते होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com