हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तेलंगणमध्ये राजन्ना राज्यम म्हणजे राजशेखर रेड्डी यांचे सरकार आणण्याचा निर्धार शर्मिला यांनी केला आहे. तेलंगणमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, त्यांनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे.
Sharmila Akka reached lotus pond!!
Meeting with YSRCP Telangana Leaders to start soon..@ysjagan#yssharmila #YSRCP #TelanganaWithYSSharmila pic.twitter.com/xy9Zm1RaWU
— YS Jagan Trends™ (@YSJaganTrends) February 9, 2021
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात मागील काही महिन्यांपासून मतभेद आहेत. जगममोहन रेड्डी यांनी बहिणीला वायएसआर काँग्रेस पक्षात कोणतेही महत्त्व न देता दूर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर शर्मिला या मागील काही महिन्यांपासून वायएसआर यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या. काँग्रेस पक्षातील वायएसआर यांचे समर्थकही त्यांच्या संपर्कात आहेत. वायएसआर पक्षाने
शर्मिला यांनी त्यांचे वडील आंध्र प्रदेश (संयुक्त) माजी मुख्यमंत्री दिवंगत राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांची बैठक घेतली. ही बैठक त्यांनी त्यांच्या लोटस पाँड येथील निवासस्थानी घेतली. या बैठकीला त्यांनी आत्मीय संमेलन असे नाव दिले होते. वायएसआर आणि विजयम्मा यांच्या लग्नाचा मंगळवारी (ता.8) ५० वा वाढदिवस असल्याने राजकीय प्रवेशासाठी हा मुहूर्त त्यांनी काढल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीत शर्मिला यांनी तेलंगणमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.
शर्मिला यांनी जाहीरपणे बोलताना जगनमोहन रेड्डी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे माझे मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद माझ्यामागे आहेत. आंध्रात ते स्वतःचे काम पुढे नेत आहे. म्हणूनच तेलंगणमध्येही राजन्नाचे राज्य आणण्याची गरज असल्याने मी येथे नवा पक्ष स्थापण करीत आहे.
शर्मिला या मार्च महिन्यात जाहीर सभा घेऊन नव्या पक्षाची घोषणा करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. पक्षाचे नाव वायएसआर तेलंगण पक्ष असे असेल, अशी शक्यता आहे. शर्मिला यांचे बंगळूरहून हैदराबादमध्ये आल्याचे समजतात राजशेखर रेड्डी यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी लोटस पाँड येथे गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आलेले.
लोटस पाँड येथे उभारलेल्या फलकावर जगनमोहन रेड्डी यांचे छायाचित्र नव्हते. यावरुन त्या आगामी काळात जगनमोहन यांच्याविरोधात पावले टाकू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. दरम्यान, शर्मिला यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केले आहे, अशी टीका वायएसआर काँग्रेसने केली आहे.

