गांधी-ठाकरेंच्या सभांना जोरदार प्रतिसाद ; भाजप-शिंदे गटाचे टेन्शन वाढणार?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, आदित्य ठाकरेंच्या सभांना जोरदार प्रतिसाद.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Rahul Gandhi
Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Rahul Gandhi Sarkarnama

चेतन झडपे

पुणे : राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा महाराष्ट्रा दौरा, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा आणि बुलडाण्यात झालेली शनिवारच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ठाकरेंच्या सभेला जमलेल्या जनसमुदायाची कालपासून एकच चर्चा होत आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. याआधी बुलडाणा जिल्ह्यात शेगाव या ठिकाणी झालेल्या राहुल गांधीयांच्या सभेलाही विक्रमी गर्दी झाली होती. या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Rahul Gandhi
पंतप्रधान मोदींनी दोन तास नीट काम केले तरी देशातील महागाई कमी होईल...

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली आहे. ठाकरेंनी आपली पहिला सभा विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात घेतली. बुलडाणा जिल्ह्यात कायमच शिवसेनेचा धबधबा राहिला आहे. मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाने, बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर, बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड, आणि सिंदखेडराजा मंतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.

बुलडाणा जिल्ह्यातील ठाकरेंचे मुख्य शिलेदारच शिंदे गटात गेल्यामुळे, जिल्ह्यात शिवसेना कमकुवत झाली, असे म्हंटले जात होते. मात्र ठाकरेंच्या सभेला झालेल्या मोठ्या गर्दीमुळे शिवसेना आजही जमिनीवर पाय रोऊन उभी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राहुल गांधीपाठोपाठ आता उद्धव ठाकरेंच्या सभेला झालेली गर्दी ही नक्कीच नोंद घेणारी ठरली आहे. राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेलाही मिळत असणारे समर्थन आणि शेगावमधील राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहिलेला जनसमुदाय, यामुळे या दोन्ही सभा विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. या सभांमुळे महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. काँग्रेस, साठी भारत जोडो यात्रा, शिवसेना ठाकरे गटासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा तसेच राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिर्डीमध्ये झालेले अधिवेशन यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Rahul Gandhi
Eknath Shinde : फ्रीजमधले खोके कोणी पचवले, हे ते जनतेसमोर येईल ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना इशारा

गांधी आणि ठाकरेंच्या सभांना झालेली गर्दी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी ही नक्कीच डोकेदुखी वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटासमोर महाविकास आघाडीचे मोठे आव्हाण असणार आहे. मात्र, या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये किती होईल हे निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. परंतु कार्यकर्त्यांना तरी सध्या चांगलेच बळ मिळाले आहे. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम आघाडीसाठी दिसेल असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com