मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्री-आमदारांवरील कंट्रोल सुटतोय?; 'या' वक्तव्यावरून झाली आतापर्यंत गोची...

Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगून देखील आमदार-मंत्री त्यांचं बोलणं मनावर घेतांना दिसत नाहीत...
Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest News
Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest NewsSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारासह शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर घडवलं आणि भाजपच्या साथीने नवं सरकार स्थापन केल आहे. शिवसेना कुणाची आणि काही आमदारांच्या निलंबनाचा निर्णय अद्यापही सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगामध्ये प्रलंबित आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कुठे सरकारची गाडी रुळावर चालत असतांना सरकारमधील काही मंत्री आणि आमदार अनावश्यक वादग्रस्त वक्तव्यं आणि वादग्रस्त कृत्य करून विरोधकांच्या हाती आयतचं कोलीत देत आहेत.

यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांची नाहक डोकेदुखी वाढवत आहेत. यावरून अनेकदा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि सत्ताधारी आमदारांना समज दिली होती. मात्र तरी देखील मंत्री, आमदारांचं ये रे माझ्या मागल्या, असचं वागणं सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा आपल्या मंत्र्यांवरील आणि आमदारांवर कंट्रोल सुटत चाललायं का?, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. (Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest News)

Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

बंडखोरीनंतर (त्यांच्या भाषेच उठाव) शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर, सदा सरवणकर याबरोबरच अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा आदी मंडळींनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य आणि कृत्य करून मुख्यमंत्र्याच्या अडचणी वाढवल्या आहेत.

आज मंत्री सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टिप्पणी करून नको तो वाद ओढवून घेतला आहे. सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी खोक्याच्या प्रश्नावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्यांचा प्रत्युत्तर देतांना सुळे यांचा एकेरी उल्लेख करत अभद्र भाषा वापली. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून यावरून पुन्हा एकदा नको त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest News
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

वादग्रस्त वक्तव्य असो किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे असो यावरून आतापर्यंत शिंदे गटाच्या आमदार, मंत्र्यांनी शिंदेंची अडचण वारंवार वाढवली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी वारंवार मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना केल्या. मात्र आमदार आणि मंत्र्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा खरच आपल्या मंत्री,आमदारांवरील कंट्रोल सुटत चाललाय का?, असा प्रश्न पडला आहे.

अब्दुल सत्तार यांनी याआधी देखील कुत्रा निशाणी द्या, मुख्यमंत्र्यांच्या पीएंसोबत घातलेली हुज्जत, नुकतीच आदित्य ठाकरेंवर पप्पू आणि रणछोडदास म्हणून केलेला उल्लेख आणि आज खासदार सुळेंबद्दल केलेलं वक्तव्य करून आपली वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच ठेवली आहे. प्रश्न असा आहे की वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील आमदार-मंत्री त्यांचं बोलणं मनावर घेतांना दिसत नाहीत यामुळे शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र यावरून दिसत आहे.

Cm Eknath Shinde-Abdul Sattar Latest News
राहुल गांधींचे हे दोन टोमणे मोदी आणि भाजप कधीच विसरू शकत नाहीत...

दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर केलेलं वक्तव्य, गुलाबराव पाटलांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुषमा अंधारे यांच्यावर नटी म्हणून केलेली टीप्पणी, आमदार संतोष बांगर यांनी पोलिसांना केलेली शिविगाळ आणि कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण, आमदार सदा सरवणकर यांचं गोळीबार प्रकरण, तर प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोक्यावरून रंगलेला वाद यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच गोची झाली होती. यामुळे मुख्यमंत्रीसाहेब आपल्या मंत्र्यां-आमदारांना आवरा असेच सांगण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com