अबब...24 तासांत चार लाख रुग्ण अन् साडेतीन हजार मृत्यू; भारताने मोडले जागतिक उच्चांक

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. भारताने मागील 24 तासांत रुग्णसंख्या वाढीचा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
india records highest single day covid cases spike in world
india records highest single day covid cases spike in world

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. जगामध्ये भारतात सर्वाधिक रुग्ण एकाच दिवसांत सापडण्याचा उच्चांक नोंदवला गेला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 146 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 853 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 993 रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाख 68 हजार 710 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.06 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.84 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 हजार 523 मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून, 828 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 375, उत्तर प्रदेश 332, छत्तीसगड 269, कर्नाटक 217, गुजरात 173, राजस्थान 155, उत्तराखंड 122, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिळनाडूतील 113 मृत्यूंचा समावेश आहे.  

कोरोनाचे राज्यनिहाय बळी (एकूण 2 लाख 11 हजार 853) 
महाराष्ट्र : 68,813
दिल्ली : 16,147  
कर्नाटक : 15,523 
तमिळनाडू : 14,046  
उत्तर प्रदेश : 12,570  
पश्चिम बंगाल : 11,344  
पंजाब : 9,022 
छत्तीसगड : 8,581 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com