मृत्यूचे तांडव थांबेना; दर तासाला देशात 174 तर महाराष्ट्रात 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू - india records highest covid19 death toll in the world in last 24 hours | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूचे तांडव थांबेना; दर तासाला देशात 174 तर महाराष्ट्रात 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 8 मे 2021

देशातील कोरोना  रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत.

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona)  रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, मृत्यूचे आकडे आता विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत तब्बल 4 लाख 1  हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूंचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. देशात आता दर तासाला सुमारे 174 जणांचा तर महाराष्ट्रात 37 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. (In India average 174 covid 19 patients die in one hour) 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा : कंगना म्हणते, कोरोना हा एक छोटासा फ्लू असून, तो माझ्या शरीरात पार्टी करतोय!  

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 37 लाख 23 हजार 446 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.01 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.90 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.09 टक्के आहे. 

देशातील राज्यनिहाय 24 तासांतील मृत्यू (एकूण मृत्यू 2,38,270) 
महाराष्ट्र : 898  
कर्नाटक : 592 
उत्तर प्रदेश : 372 
दिल्ली : 341 
छत्तीसगड : 208 
तमिळनाडू : 197 
पंजाब : 165 
राजस्थान : 164 
हरियाना : 162 
उत्तराखंड : 137 
झारखंड : 136 
गुजरात : 119 
पश्चिम बंगाल : 112 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख