मृत्यूचे थैमान : कोरोनामुळे दर तासाला देशात 146 तर महाराष्ट्रात 34 जणांचा होतोय मृत्यू - india records biggest single day covid deaths in world | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूचे थैमान : कोरोनामुळे दर तासाला देशात 146 तर महाराष्ट्रात 34 जणांचा होतोय मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 1 मे 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरू आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 4 लाख 1 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात एकाच सर्वाधिक कोरोन रुग्ण नोंदवण्याचा विक्रम भारताने नोंदवला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 146 जणांचा तर महाराष्ट्रात दरतासाला 34 जणांचा  कोरोनामुळे बळी जात आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 853 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 993 रुग्ण सापडले असून, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाख 68 हजार 710 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.06 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.84 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 

मागील 24 तासांत देशात 3 हजार 523 मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातील असून, 828 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्ली 375, उत्तर प्रदेश 332, छत्तीसगड 269, कर्नाटक 217, गुजरात 173, राजस्थान 155, उत्तराखंड 122, झारखंड 120, पंजाब 113 आणि तमिळनाडूतील 113 मृत्यूंचा समावेश आहे.  

कोरोनाचे राज्यनिहाय बळी (एकूण 2 लाख 11 हजार 853) 
महाराष्ट्र : 68,813
दिल्ली : 16,147  
कर्नाटक : 15,523 
तमिळनाडू : 14,046  
उत्तर प्रदेश : 12,570  
पश्चिम बंगाल : 11,344  
पंजाब : 9,022 
छत्तीसगड : 8,581 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख