दिलासादायक : मागील 24 तासांत नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे सुमारे लाखभर जास्त

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
india records 3 lakh 69 thousand recoveries in last 24 hours
india records 3 lakh 69 thousand recoveries in last 24 hours

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच आहे.  जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात मागील 24 तासांत 2 लाख 76 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 लाख 69 हजार रुग्ण बरे झाले आहेत. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 76 हजार 110 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 57 लाख 72 हजार 440 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 87 हजार 122 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 31 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 31 लाख 29 हजार 878 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 12.14 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.74 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 23 लाख 55 हजार 440 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.11 टक्के आहे. 


देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com