Karnataka Assembly Elections : सात टक्के मते आणि 70 जागांचा फरक! काँग्रेसने भाजप अन् जेडीएसचे बालेकिल्ले केले उद्ध्वस्त?

Karnataka Elections News : मध्य-कर्नाटक, बंगळुरु, हैदराबाद कर्नाटक मुंबई-कर्नाटक मध्ये काँग्रेसचा मोठा विजय
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023 Sarkarnama

Karnataka Assembly Elections Result News : काँग्रेसला कर्नाटकचा मोठा जनादेश मिळाला असून पक्षाला 43 टक्के मतांसह 135 जागा जिंकण्यात यश आले. गेल्या तीन दशकांतील काँग्रेसचा कर्नाटकातील 'हा' सर्वात मोठा विजय आहे. भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या केवळ 65 जागा जिंकण्यात मिळाले. तर जेडीएसच्या खात्यात केवळ 19 जागा आल्या.

हैद्राबाद-कर्नाटक विभागात काँग्रेस एक मजबूत पक्ष आहे. कोस्टल-कर्नाटक व मुंबई-कर्नाटक हे भाजपचे बालेकिल्ले आहेत. जुन्या म्हैसूर भागात जेडीएस हा सर्वात शक्तिशाली पक्ष मानला जात होता. मात्र, यावेळी सर्व समीकरणे कोलमडली आहेत. कर्नाटकात साधारणपणे तिरंगी लढत पाहायला मिळते.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Elections : बसवराज बोम्मईंचे धोरण बरोबर होते, पण शिंदे-फडणवीस सरकारमुळे झाली अडचण...

1) किनारी-कर्नाटक प्रदेशात 19 जागा आहेत. ज्यापैकी भाजपने 12, काँग्रेसने 6 आणि जेडीएसने फक्त एक जागा जिंकली आहे. हा एकमेव प्रदेश आहे जिथे भाजपने काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा जिंकल्या. कोस्टल कर्नाटकमध्ये नेहमीच भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ-सरळ लढत असते. 2018 प्रमाणेच यंदाही भाजपला (BJP) येथे 49 टक्के तर काँग्रेसला 43 टक्के मते मिळाली.

2) मध्य-कर्नाटक मध्य कर्नाटकमध्ये 23 जागा आहेत. या भागाला स्विंग क्षेत्र म्हणतात. येथे काँग्रेसने 15 जागा जिंकल्या. 2018 मध्ये भाजपने जवळपास तितक्याच जागा येथे जिंकल्या होत्या. 2008 च्या निवडणुकीमध्ये येथे भाजप सर्वात मोठा पक्ष होता.

3) बंगळुरूमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची नेहमीच टक्करे असते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांनीही जवळपास 40 टक्के मते मिळवली. 2013 मध्ये भाजपला येथे 32 टक्के मते मिळाली होती. हा वाटा पक्षाच्या राज्याच्या सरासरी 20 टक्क्यांपेक्षा 12 टक्के जास्त होता. यावेळी येथे काँग्रेसला 13 जागा जिंकल्या, 2018 च्या तुलनेत दोन कमी आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला चार जागांचा फायदा झाला. जेडीएसला एकही जागा मिळाली नाही.

Karnataka Assembly Election 2023
IPS Praveen Sood New CBI Director : वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

4) हैदराबाद कर्नाटक प्रदेशात काँग्रेसने (Congress) एकूण 40 पैकी 26 जागांवर विजय मिळवला आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने 5 अधिक जागांवर येथे विजयी कामगिरी केली. २०१८ मध्ये काँग्रेसचा 21 तर भाजपचा 13 जागांवर विजय झाला होता. 2023 च्या निवडणुकीत भाजपाचा फक्त 10 जागांवर विजय झाला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे याच भागातील आहेत.

5) मुंबई-कर्नाटक काँग्रेस पक्षाने येथे 50 पैकी 33 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपची संख्या 2018 मधील 33 वरून घटून यावेळी 16 वर आली आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत काँग्रेसला तीन दशकांत प्रथमच या प्रदेशात 40 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. राज्यातील 69 लिंगायतबहुल विधानसभा जागांपैकी (ज्या जागा लिंगायत लोकसंख्येच्या 20 टक्क्यांचा आहे. यामध्ये उत्तर आणि मध्य कर्नाटकात) काँग्रेसने 45 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 20 जागा मिळाल्या.

Karnataka Assembly Election 2023
Rahul Gandhi News : 'भारत जोडो'नंतर कर्नाटकच्या विजयाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी झळाळी!

6) जुने-म्हैसूर हा भाग जेडीएसचा गड मानला जाणारा एकमेव प्रदेश आहे. जेडीएस हा नेहमीच आघाडीचा पक्ष राहिला आहे. यावेळी, काँग्रेस पक्षाने जेडीएसपेक्षा चांगली कामगिरी केली. काँग्रेसने 42 टक्के मते मिळविली. 2018 मध्ये त्यांच्या वाट्यापेक्षा सात टक्के जास्त आहे. येथे काँग्रेसने 43 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे जेडीएसला (JDS) 26 टक्के मतांसह 64 विधानसभा जागांपैकी केवळ 14 जागा मिळाल्या. भाजपला या भागात दोन टक्के जास्त मते मिळाली, मात्र येथे 11 जागा गमवाव्या लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com