BJP Finance Source : राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्येही भाजपच नंबर वन !

निवडणूक रोखे' ही भारतातील कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींकडून राजकीय पक्षांना देणग्या मिळवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक ना-नफा शाखा आहे.
BJP India
BJP India

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सन (ADR) 2021-22 या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या (Electoral Trust) माध्यमातून मिळालेल्या देणग्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. पण या ट्रस्टला देणगी देणाऱ्या कॉर्पोरेट्सची ओळख मात्र अज्ञात असते.

या अहवालानुसार 2021-22 मध्ये या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सुमारे 487 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, यात सर्वाधिक 351.50 कोटी रुपयांच्या देणग्या भाजपला मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसला केवळ 18.44 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

इलक्टोरल ट्रस्ट/ निवडणूक रोखे म्हणजे नक्की काय?

केंद्र सरकारने २०१७ मध्ये वित्त विधेयकात इलेक्टोरल ट्रस्ट या योजनेची कल्पना मांडली. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीत पारदर्शकता आणणे या योजनेमागचा हेतू आहे. २०१८ या वर्षी या योजनेली सुरुवाती झाली. कोणताही भारतीय व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा कंपनी हे निवडणूक रोखे विकत घेऊ शकते.

BJP India
Kirit Somaiya : असे आहेत किरीट सोमय्यांचे नव्या वर्षातले नवे संकल्प !

देशात केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही अधिकृत शाखांमध्ये वर्षांतील काही ठराविक दिवसांमध्ये हे रोखे बॅंकेकडून जारी केले जातात. या रोख्यांचे स्वरूप वचनपत्रांप्रमाणे म्हणजेच प्रॉमिसरी नोट प्रमाणे असते. तर एक हजार रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंत मूल्य असलेले हे रोखे संबंधित व्यक्ती किंवा उद्योजक हे रोखे विकत घेऊ शकतात आणि त्यांच्या पसंतीच्या राजकीय पक्षाला देणगी देऊ शकतात. विशेष म्हणजे राजकीय पक्षांना हे रोखे १५ दिवसांत वटवण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेत देणगीदाराचे नाव मात्र गोपनीय ठेवले जाते.

कोणत्या पक्षाला किती निधी?

भारतीय जनता पक्षाला 351.50 कोटी रुपये मिळाले, म्हणजे 2021-22 मध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी सर्वाधिक 72.17 टक्के देणग्या एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. तर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), समाजवादी पक्ष (SP) ), आम आदमी पार्टी (AAP) आणि YSR काँग्रेसलाही कमी देणग्या मिळाल्या आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

निवडणूक रोखे' ही भारतातील कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींकडून राजकीय पक्षांना देणग्या मिळवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक ना-नफा शाखा आहे. एडीआरच्या अहवालानुसार 2021-22 मध्ये भाजपला निवडणूक रोख्यांकडून काँग्रेसपेक्षा 19 पट जास्त देणग्या मिळाल्या. भाजपला मिळालेली एकूण देणगी इतर 9 पक्षांना मिळालेल्या देणग्यांपेक्षा 2.5 पट अधिक असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

BJP India
Dada Bhuse; दादा भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन

एडीआरच्या अहवालानुसार, काँग्रेसला निवडणूक रोख्यांकडून 18.44 कोटी रुपये मिळाले, तर टीआरएसला 40 कोटी रुपये, सपाला 27 कोटी रुपये आणि आम आदमी पक्षाला 21.12 कोटी रुपये आणि वायएसआर काँग्रेसला 20 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. याशिवाय अकाली दलाला ७ कोटी, पंजाब लोक काँग्रेस पक्षाला १ कोटी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची देणगी मिळाल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

तसेच 2021-22 या आर्थिक वर्षात निवडणूक रोख्यांना मिळालेल्या देणग्यांपैकी कॉर्पोरेट हाऊसेस आणि व्यक्तींकडून एकूण 487.09 कोटी रुपये मिळाले असून यातील 487.06 कोटी रुपये (99.99 टक्के) विविध राजकीय पक्षांमध्ये वितरितही करण्याच आल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.

BJP India
Rahul Gandhi : '२०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधीच असतील पंतप्रधान पदाचा चेहरा'

वित्त वर्ष 2021-22 में इलेक्टोरल ट्रस्ट को 89 कॉरपोरेट/व्यावसायिक घरानों ने 475.80 करोड़ रुपये का योगदान दिया, जिनमें से 62 ने प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट को 456.30 करोड़ रुपये चंदा दिया, दो कॉरपोरेट ने एबी जनरल इलेक्टोरल ट्रस्ट को 10 करोड़ रुपये का योगदान दिया, तीन कॉरपोरेट ने समाज इलेक्टोरल ट्रस्ट को पांच करोड़ रुपये का योगदान दिया और 15 कॉरपोरेट ने इंडिपेंडेंट इलेक्टोरल ट्रस्ट को 2.20 करोड़ रुपये का योगदान दिया.

89 कॉर्पोरेट/व्यवसाय संस्थांकडून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 475.80 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत त्यापैकी 62 कॉर्पोरेट्स कडून प्रुडंट रोख्यांना 456.30 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. तर दोन व्यावसायिकांनी एबी जनरल रोख्यांना 10 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. तर तीन व्यायवसायिकांकडून पाच कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. तर तीन कॉर्पोरेट्सकडून समाज निवडणूक रोख्यांना ५ कोटी रुपयांच्या देणग्या आणि 15 कॉर्पोरेट्सनी इंडिपेंडेंट रोख्यांना 2.20 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत.

एडीआरने दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 40 व्यक्तींनी इलेक्टोरल ट्रस्टमध्ये देणग्या दिल्या आहेत. त्यापैकी 13 जणांनी प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टला 8.53 कोटी रुपयांचे देणगी दिली आहे. 15 व्यक्तींनी स्वतंत्र निवडणूक रोख्यांसाठी 2.61 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर 12 जणांनी स्मॉल डोनेशन रोख्यांला एकूण 14.34 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, सर्व देणगीदारांमध्ये आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेडने निवडणूक रोख्यांना सर्वाधिक ७० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आर्सेलर मित्तल डिझाईन अँड इंजिनिअरिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेडने ६० कोटी रुपये आणि भारती एअरटेल लिमिटेडने ५१ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

याशिवाय, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत भाजपचा वाटा सुमारे 10 टक्क्यांनी कमी झाला असला, तरी भाजपला मिळालेल्या पैशात सुमारे 130 कोटींची वाढ झाली आहे. एडीआच्या अहवालानुसार, सर्व राजकीय पक्षांना निवडणूक ट्रस्टकडून मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी 82.05 टक्के (रु. 212.05 कोटी) निधी भाजपला मिळाला आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने बनवलेल्या नियमांमध्ये, निवडणूक रोख्यांना त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 95 टक्के रक्कम नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्याची अट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in