Rajya Sabha Election : प्रतापगढींची मराठीतून शपथ! यावरच काॅंग्रेस नेते खूष!!

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने चुरस
Imran Pratapgarhi
Imran Pratapgarhisarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha election 2022) काॅंग्रेसने धक्कातंत्र वापरत राज्यातील नेत्यांना संधी नाकारली. त्यांच्याऐवजी उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांना उमेदवारी दिल्याने काॅंग्रेसमध्ये सध्या चुळबूळ सुरू आहे. प्रदेश काॅंग्रेसमधील नेत्याने अद्याप थेट यावर नाराजी व्यक्त केली नसली तरी ती कधीही उघड होण्याची शक्यता आहे. प्रतापगढी यांनी आज उमेदवारी अर्ज भरताना मराठीतून शपथ घेतली याचेच कौतुक करत काॅंग्रेस नेत्यांनी वेळ मारून नेली.

या निवडणुकीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला. ``राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे पण विरेधी पक्षाने या परंपरेला तिलांजली दिली आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान होत असते, महाविकास आघाडीकडे बहुमत असून आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील.``

Imran Pratapgarhi
Sarkarnama Open Mic Challenge: इम्तियाज जलील खरंच आहे का भाजपची टीम बी

काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांचा उमेदवारी अर्ज आज दुपारी सादर करण्यात आला, प्रतापगढी यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, आमदार अमिन पटेल, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष सुनील देशमुख, सरचिटणीस देवानंद पवार आदी उपस्थित होते.

Imran Pratapgarhi
महाविकास आघाडीच्या आमदारांची मते फुटणार नाहीतच... प्रफुल्ल पटेलांनी सांगितले कारण

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी फॉर्म भरताना मराठीतून शपथ घेतली. देशाची एकात्मता मानणारा, त्या विचारला मानणारा, भाषेला मानणारा उमेदवार दिल्याबद्दल मा. सोनियाजी आणि राहुलजी गांधी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, पक्षात लोकशाही असून प्रतापगढी यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. एका तरुण आणि उत्साही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. राज्यसभा उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून जी चर्चा सुरु आहे ती निरर्थक आहे. भाजपामध्ये तर लोकशाहीच नाही, मत मांडण्याचाही अधिकार त्यांच्या पक्षात नाही. त्यामुळे त्यांच्या टिकेकडे आम्ही फारसे गांभिर्याने पहात नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com