पदोन्नतीसाठी बनवला न्यायालयाचा बनावट आदेश; आयएएस अधिकाऱ्याला अटक

जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांचा आदेश त्यांनी तयार केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
IAS officer arrested for forging court orders to escape an assault case
IAS officer arrested for forging court orders to escape an assault case

भोपाळ : एका महिलेने दाखल केलेल्या फौजदारी गुन्ह्यात न्यायालयाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचा बनावट आदेश तयार करून त्याद्वारे पदोन्नती मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाच्या सेवेतून आयएएस (IAS) साठी पदोन्नतीसाठी एका अधिकाऱ्यानेच ही बनवाबनवी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. (IAS officer arrested for forging court orders to escape an assault case)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हा प्रकार असून संतोष कुमार वर्मा (Santosh verma) या आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आले आहे. पदोन्नती मिळाल्यानंतर ते भोपाळमध्ये अतिरिक्त आयुक्त होते. मध्य प्रदेशात राज्य प्रशासकीय सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती केली जात होती. त्यासाठी वर्मा यांना त्यांच्याविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवण्यात आली. 

हेही वाचा : मंत्री व नेत्यांना सांगा, तुम्हाला किती अनौरस मुलं?

वर्मा यांच्याविरूध्द एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार इंदौरमध्ये गुन्हा दाखल आहे. वर्मा यांनी या महिलेसोबत असलेला वाद संपला असून आपल्याला न्यायालयाने निर्दोष असल्याचा आदेश दिल्याचे कागदपत्रे सादर केली. पोलिस महासंचालक हरिनारायण मिश्रा यांनी वर्मा यांच्या कागदपत्रांच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले. 

या चौकशीमध्ये वर्मा यांनी सादर केलेला आदेशच बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदौर पोलिसांनी न्यायाधीशांची बनावट सही असलेला आदेश जप्त केला. त्यानंतर 27 जून रोजी न्यायाधीशांनीच फसवणूक व षडयंत्राची तक्रार दिली. या प्रकरणात वर्मा हे दोषी असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांना रविवारी अटक केली.

न्यायालयाचा बनावट आदेश तयार करून आयएएससाठी पदोन्नती मिळवलेला हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासन व न्यायालयातही खळबळ उडाली आहे. जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांचा आदेश त्यांनी तयार केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. त्यांना आयएएस पुरस्कारही मिळणार होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com