विखुरलेली कॉंग्रेस पुण्यात एकसंधपणे कशी लढणार ?

नेतृत्वाच्या अभावामुळे गेल्या दहा वर्षात पुण्यातली कॉंग्रेस कमकुवत होत गेली.
कॉंग्रेस भवन
कॉंग्रेस भवनसरकारनामा

पुणे : पुण्यातल्या कॉंग्रेसमधील वाद हा तसा नवा नाही. कालच्या प्रकाराने त्यात पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसची भर पडली आहे.एकमुखी नेतृत्वाचा अभाव हे कॉंग्रेसमधील या वादाचे मूळ कारण आहे.पुण्यातल्या कॉंग्रेसमध्ये तीन-चार गट आहेत. कुणाशी कुणाचे पटत नाही. प्रत्येकाचे नेतृत्व स्वतंत्र आहे. प्रत्येकजण पक्षश्रेष्ठींच्या जवळचा आहे.कार्यकर्ते कॉंग्रेसऐवजी प्रत्येक नेत्याच्या गटानुसार विभागलेले आहेत.महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.या परिस्थितीत शहर कॉंग्रेस निवडणुकीला कशी सामोरी जाणार हा खरा प्रश्‍न आहे.

कॉंग्रेस भवन
`ती` बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली, तेव्हा साहित्यिक गप्प कसे बसले?

पुणे कॉंग्रेसला नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. काकासाहेब गाडगीळांपासून सुरेश कलमाडींपर्यंत अनेकांनी सक्षमपणे शहर कॉंग्रेसचे नेतृत्व केले. त्या काळातही गटतट होते.मात्र, त्यात अशाप्रकारची स्पर्धा नव्हती. गट होते तरी नेतृत्वासमोर अशा गटतटांचे काही चालत नसे.पुण्यात कॉंग्रेची ताकददेखील निर्विवाद होती. कॉंग्रेसचा तो सुवर्णकाळ होता.आता परिस्थिती उलटी झालीय. सुवर्णकाळही गेला आणि नेतृत्वही गेले.दिल्लीपासून गल्लीपर्यंत कॉंग्रेसला सक्षम नेतृत्व नाही ही स्थिती पुण्याच्या अनुषंगाने तरी निश्‍चितपणे खरी आहे.

कॉंग्रेस भवन
ओमायक्रॉनबाबतच्या कडक नियमावलीबाबत अजितदादा म्हणाले..

कॉंग्रेसची आजची अवस्थी दयनीय आहे. एकमुख नेतृत्व नाही. गटतट वाढले आहेत. राज्यातील नेत्यांनाही पुण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणण्यापेक्षा त्यांची तशी तयारी नाही.अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्‍वजीत कदम यांच्यासारख्या राज्यातील बड्या नेत्यांनी शहर कॉंग्रेसचे नेतृत्व करावे, अशी भावना सच्च्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे. मात्र, यातला प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात अडकला आहे. पुण्याचे नेतृत्व करण्याची कुणाची तयारी नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हा जिल्हा असल्याचे बाहेरचा कुणी येऊन पुणे कॉंग्रेसला सक्षम नेतृत्व देण्याचे धाडस करत नाही हे जाहीरपणे कुणी मान्य करणार नाही. मात्र, ही वस्तुस्थिती आहे.

नेतृत्वाच्या अभावामुळे गेल्या दहा वर्षात पुण्यातली कॉंग्रेस कमकुवत होत गेली. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस ती जागा घेऊ पाहात आहे. अजित पवार यांच्यासारखे सक्षम नेतृत्व राष्ट्रवादीकडे आहे. प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. कार्यकर्त्यांना वेळ देऊन झटपट निर्णय ही अजित पवारांची कार्यशैली पक्षाला अधिक मजबूत करीत आहे. याच्या अगदी उलट अवस्था कॉंग्रेसमध्ये आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र,पक्षात काही आलबेल नाही. शहर पातळीवरच्या प्रत्येक नेत्याचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याबरोबर या नेत्यांचा म्हणावा तसा समन्वय नाही. शहराध्यक्ष बागवे त्यांच्या परीने संघटनेचे काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र, संघटनेत एकसंधपणा नसल्याने त्यांच्या कामाला म्हणावे तसे यश मिळत नाही.

या साऱ्या परिस्थितीत पुण्यात महापालिका निवडणूक कॉंग्रेस कशी लढणार हा खरा प्रश्‍न आहे. पक्षाची अशी स्थिती असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शहराध्यक्ष रमेश बागवे स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहेत.शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य पातळीवर मजबूत मोट बांधण्याची यशस्वी झाले आहेत. पुण्यातही दोन्ही संघटनांच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. मात्र, संघटनेच्या पातळीवर कमकुवत झालेली कॉंग्रेस स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहे.शिवसेना-राष्ट्रवादीपासून फटकून वागण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे मजबूत आव्हान तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीमधला एकोपा. या स्थितीत स्वतंत्र बाणा ठेऊन कॉंग्रेस आपले अस्तित्व कसे राखणार हा खरा प्रश्‍न आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com