Sanjay Raut किती दिवस तुरुंगात राहणार?

PMLA कायद्यानुसार झालेली कारवाई सर्वात कठोर समजली जाते...
Nawab Malik,Sanjay Raut, anil deshmuk
Nawab Malik,Sanjay Raut, anil deshmuksarkarnama

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा चार दिवसांची कोठडी आज ED न्यायालयाने दिली. अंमलबजावणी संचालनालयाने आज संजय राऊत यांच्याविरोधात आणखी आरोप करत त्यांच्या पत्नी वर्षा यांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढतच चालला आहे. राऊत हे किती काळ कोठडीत राहणार, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. राऊत हे ईडीच्या कोठडीतून नंतर तुरुंगात जातील, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसते आहे.

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना ईडीने अटक केली आहे. त्यात अनिल देशमुख यांना अटक होऊन एक वर्ष झाले आहे. मलिक यांना 22 मार्च 2022 रोजी तर अनिल देशमुख यांना 21 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली आहे. या दोघांनाही अद्याप जामीन मिळालेला नाही.

Nawab Malik,Sanjay Raut, anil deshmuk
शिंदे गटाला केंद्रात ३ मंत्रिपद; राहुल शेवाळे, प्रताप जाधव, श्रीरंग बारणेंची नावं चर्चेत

संजय राऊत हे कधी सुटतील, असा प्रश्न खुद्द छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. कारण ते स्वतः तीन वर्षे तुरुंगात होते. त्यावर बोलताना भुजबळ यांनी प्रांजळपणे सांगितले की ईडी ज्या कायद्यानुसार कारवाई करते तो कायदा कठोर आहे. त्यामुळे यात जामीन मिळणे अतिशय अवघड आहे. परिणामी राऊत हे कधी सुटतील हे कोणीच सांगू शकत नाही.

प्रिव्हेंशन ऑफ मनी लाॅंडरींग अॅक्ट (PMLA) हा कायदा काळा पैसा पांढरे करण्यास प्रतिबंध करतो. यातील अनेक तरतुदी आरोपींसाठी जाचक आहे. आपण निष्पाप आहोत, हे दाखविण्याची जबाबदारी आरोपीवर असते. ईडी फक्त आरोप करत राहते. ते त्यांनी सिद्ध केलेच पाहिजेत असे नाही. त्यामुळे ईडीचे म्हणणे ग्राह्य धरूनच न्यायाधीश कोठडी सुनावतात. जामीन देताना ईडीचे म्हणणे ऐकल्याशिवाय न्यायाधीश निर्णय घेऊ शकत नाही. तसेच यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी कोणतीच मुदत नाही. इतर गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींची सुटका न्यायालय करते. कारण आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपास पूर्ण झाला असे समजले जाते. पीएमएलए अॅक्टनुसार अशी मुदत नसल्याने ईडी आपल्या ताब्यात आरोपींना त्यांच्या मर्जीनुसार ठेवू शकते.

Nawab Malik,Sanjay Raut, anil deshmuk
'शिंदे-फडणवीसांना ८ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही!'

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या स्वीय सहायकाला अटक केली होती. राज्यातील राजकीय घडामोडी होऊन सत्तांतर झाले. गवळी यांनी बंडखोरांना साथ दिली. त्यानंतर त्यांच्या स्वीय सहायकाची कोठडीतून सुटका सहा महिन्यांनंतर झाली. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकरणात ईडी वेगवेगळी भूमिका घेते, असे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in