लॉकडाउन काळातील गुन्हे मागे घेणार; गृहमंत्री देशमुखांची मोठी घोषणा

राज्यात लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन लाखांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
home minister anil deshmukh says will take back cases of lockdown
home minister anil deshmukh says will take back cases of lockdown

मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाउन लागू केला होता. या लॉकडाउनच्या काळातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.  आता गृहमंत्री अनिल देशमुखांनी या संदर्भात मोठी घोषणा केली असून, हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे म्हटले आहे. 

राज्यभरात भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत सुमारे 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचबरोबर 1 हजार 347 वाहनमालकांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. लॉकडाउन काळात नियम तोडणाऱ्या नागरिकांना 28 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याचबरोबर 37 हजार 42 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच, 96 हजार 340 वाहने जप्त करण्यात आली होती. लॉकडाउन काळात पोलिसांवर हल्ला करण्याची 364 प्रकरणे घडली होती. या प्रकरणी 895 जणांना अटक झाली असून, पुढील न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान (आयपीसी) 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com