पंतप्रधान मोदी हुकूमशहा असल्याची टीका का? अमित शहांनीच सांगितलं कारण...

अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
HM Amit Shah & PM Narendra Modi.
HM Amit Shah & PM Narendra Modi.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या कारकिर्दीला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या कालावधीत त्यांच्यावर हुकूमशहा (Dictator) असल्याची टीका अनेकदा झाली आहे. काँग्रेससह बहुतेक विरोधकांनी मोदींनी देशावर हुकूमशाही लादल्याची टीका केली आहे. विरोधकांनी मोदींची प्रतिमा हुकूमशहा अशी केली आहे. याचं कारण गृहमंत्री अमित शहांनीच (Home Minister Amit Shah) सांगितलं आहे.

अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचं स्पष्टीकरण दिलं आहे. शहा म्हणाले, पंतप्रधानांनी प्रशासनातील अनेक बारकावे समजून घेतले आहेत गुजरातमध्ये भाजपची स्थिती चांगली नसताना त्यांनी पक्षाला उभं केलं. ते सगळ्यांचे मुद्दे ऐकून घेतात. त्यांच्यापेक्षा वयाने, अनुभवाने लहान असलेल्या व्यक्तींच्या सुचनांवरही ते विचार करतात अन् नंतरच निर्णय घेतात. मी त्यांचे काम अत्यंत जवळून पाहिले आहे.

HM Amit Shah & PM Narendra Modi.
चिपी विमानतळाची थेट पंतप्रधान मोदींनी घेतली दखल अन् म्हणाले...

पंतप्रधान मोदींवर होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत शहा म्हणाले, मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कोणतीही बैठक असतो, ते तिथे कमीत कमी बोलतात आणि इतरांचे अत्यंत संयमाने ऐकून घेतात. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जातो. ते इतका काय विचार करत असतील, असंही अनेकदा आम्हाला वाटतं. पण ते सर्वांचे मुद्दे ऐकून घेऊन आलेल्या प्रत्येक सुचनेला गुणवत्तेच्या आधारे महत्व देतात. त्यामुळे ते निर्णय थोपवतात, असं म्हणणं अत्यंत चुकीचे आहे, असं शहा यांनी स्पष्ट केलं.

मोदींना विरोधकांकडून हुकूमशहा का म्हटले जाते, यावर बोलताना शहा म्हणाले, हे जाणूनबुजून केलं जात आहे. बैठकीत झालेली चर्चा बाहेर येत नाही. तेव्हा लोकांना वाटते की एकटे मोदीच निर्णय घेतात. जनता आणि पत्रकारांनाही माहिती नसतं, की हे निर्णय सामूहिक चर्चेतून घेतले जातात. आणि स्वाभाविकच आहे, अंतिम निर्णय तर मोदीजीच घेणार आहेत. कारण तसा अधिक जनतेने त्यांना दिला आहे. पण सगळ्यांशी बोलून, प्रत्येकाल बोलण्याची संधी देत, त्यातील नकारात्मक-सकारात्मक बाबींचा विचार करून निर्णय घेतले जातात, असं शहा यांनी नमूद केलं.

काही लोक आमचे वैचारिक विरोधक आहेत. ते त्यांच्या पध्दतीने सत्य गोष्टींना तोडून-मोडून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांचा पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असतो, अशी टीकाही शहा यांनी केली. पंतप्रधान मोदी जोखीम पत्करून काही निर्णय घेतात. कारण त्यांनी बोलून दाखवले आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत, सरकारमध्ये राहण्यासाठी नाही. आमचं ध्येय हे देशात परिवर्तन आणण्याचे आहे. मोदींचं ध्येय सत्तेत राहण्याचं नाही तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे देशाला पुढे नेण्याचं आहे. त्यामुळे ते जोखीम पत्करून आव्हानात्मक निर्णय घेतात, असे शहा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com