संजय राऊतांवर गंभीर आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मातीला जामीन नाहीच

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
high court refuses to grant bail to film producer swapna patkar
high court refuses to grant bail to film producer swapna patkar

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) जामीन (Bail) अर्जावर थेट सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयात (High Court) नकार दिला आहे. नियमित प्रक्रियेनुसार सत्र न्यायालयात जामीन अर्ज प्रथम करावा, अशी सूचना खंडपीठाने केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या त्या आहेत. 

महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या निर्मातीचा जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राऊत यांनी छळवणूक करुन धमकावल्याचा आरोप करणारी याचिका निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी दाखल केली आहे. यावर न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि जी. ए. सानप यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

याचिकाकर्त्याला एका प्रकरणात खोट्या आरोपाखाली अटक झाली आहे. या प्रकरणी त्यांचा केलेला जामीन महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नामंजूर केला आहे. स्वप्ना पाटकर यांच्या वतीने ड. आभा सिंह यांनी ही माहिती खंडपीठाला दिली. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनुसार यावर सत्र न्यायालयात सुनावणी प्रथम व्हावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

राऊत यांच्यावर आरोप करणारी आणखी एक याचिका पाटकर यांनी केली आहे. राऊत यांच्या दबावामुळे बोगस पदवीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे; या याचिकेत राऊत यांना प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे आरोप  ज्यांच्यावर आहेत त्यांना प्रतिवादी करावे, अशी सूचना खंडपीठाने केली. 

दरम्यान, या याचिकेवर मुंबई पोलिस आयुक्तांनी खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीवेळी दिले होते. याचिकाकर्त्याने फौजदारी याचिका केल्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, असे त्यांनी सांगितले. मात्र, याचिकेत याचा उल्लेख केला नाही, असे खंडपीठाने निदर्शनास आणले. तसेच, याबाबत याचिकेत सुधारणा करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com