आरोग्यमंत्री बदलले पण लशींचा पुरवठा नाही सुधारला... - Health Minister changed but supply of vaccines did not improve ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

आरोग्यमंत्री बदलले पण लशींचा पुरवठा नाही सुधारला...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 जुलै 2021

केंद्रातील आरोग्यमंत्री बदलताच लसींच्या पुरवठ्याचे गणित व त्याचा आलेख घसरताना दिसत आहे.

नवी दिल्ली : येत्या डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा विडा उचलणाऱ्या केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ पर्यंत २२५ कोटी डोस उपलब्ध होतील असा दावा सर्वोच्च न्यायालयात केला होता. प्रत्यक्षात केंद्रातील आरोग्यमंत्री बदलताच लसींच्या पुरवठ्याचे गणित व त्याचा आलेख घसरताना दिसत आहे.

जुलै महिन्यात १७ .८ कोटी डोस राज्यांना दिले जातील असे याआधी सांगणाऱ्या केंद्राने आता या महिन्यात १३.५ कोटी लसीच उपलब्ध होतील अशी कोलांटउडी मारली आहे. सहाजिकच देशातील दैनंदिन लसीकरणाचा आकडाही जेमतेम ४४ लाख पर्यंत राहाण्याची शक्यता आहे.(Health Minister changed but supply of vaccines did not improve ...)

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये डॉ. हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्री पद गमवावे लागले व गुजरातचे मनसुख मंडाविया यांच्याकडे हे पद आले. त्यानंतर लसीकरणाच्या पुरवठ्याबाबत आता मिळालेल्या माहितीनुसार प्रतिकूल कल दिसत आहे. कोव्हिशिल्ड वगळता इतर दोन्ही लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. केंद्राने सर्वोच्च न्यालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार जुलैत कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन २ कोटींहून साडेसात कोटींवर जाईल असा दावा केला होता. त्याच धर्तीवर कोव्हिशिल्डचे साडेसात कोटी व स्पुटनिक चे २.०८ कोटी डोस या महिन्यात मिळतील असे सांगण्यात आले होते. 

केंद्राने नुकतेच एक पूरक प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात लसींचा पुरवठा लक्षणीयरीत्या कमी असेल असे म्हटले आहे. कोव्हॅक्सिनचे साडेसात कोटी नव्हेतर २ कोटी डोसच या महिन्यात मिळतील,असे त्यात म्हटले आहे.जुलैत राज्यांना १३ कोटी ५० लाख डोस दिले जातील असे मंडाविया यांनी आता जाहीर केले. आहे.मंत्री बदलताच  लसीचे गणितही बदलले. १४ मे रोजी केंद्राने म्हटले होते, की जुलैत १७ कोटी ८ लाख डोस मिळतील. २३ जूनला सरकारने म्हटले की जुलैत राज्यांना २२ कोटी डोस  केंद्राकडून दिले जातील.मंडाविया यांनी काल दिलेली आकडेवारी पाहता या महिन्यात  राज्यांना मिळणाऱ्या डोसची संख्या १३ कोटी ५० पर्यंत खाली आली आहे. ही संख्या  आधार मानली  तर रोजच्या लसीकरणाची सरासरी जेमतेम ४४ लाखापर्यंतच जाते.

लसीकरणात ४१ टक्के घट
जागतिक योगदिनी (२१ जून) देशाने ८५ लाख लसीकरणाचा विश्वविक्रम केल्यावर थॅंक यू मोदी जी असे फलक जागोजागी दिसू लागले. मात्र २६ जूनला हा आकडा ६४ लाख ८० हजारांवर आला. १३ जुलैला तो ३७ लाख ६८ हजार पर्यंत घसरला. २१ जूनच्या विक्रमी लसीकरणाच्या तुलनेत ही घट ४१.४ टक्के होती. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांत लसीचा दुष्काळ पडला असून लोकांना लसीकरण केंद्रांवर तासनतास रांगांमध्ये उभे राहिल्यावरही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मंडाविया यांनी मात्र या तक्रारी फेटाळताना राज्य सरकारांच्या गैरव्यवस्थापनानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला आहे.

डिसेंबरपर्यंतचा लसीकरणाचा नवीन आराखडा
कोव्हिशिल्ड : जुलैतील आकडा ७ कोटी ५० लाख, मिळणार १० कोटी
कोव्हॅक्सिन : जुलैतील आकडा ७ कोटी ५० लाख, मिळणार २ कोटी
स्पुटनिक : जुलैतील आकडा २ कोटी ८ लाख. मिळणार किती हे जाहीर केलेले नाही.

Edited by < Umesh Ghongade
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख