ठाकरेंनी वाढले धैर्यशील मानेंचे टेन्शन; हातकणंगलेमध्ये समीकरणं बदलणार

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात मोहिम उघडली आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Sarkarnama

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करुन 40 आमदार आणि 13 खासदारांना आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात मोहिम उघडली आहे. त्यामुळे ठाकरेंनी आता हातकणंगले मतदारसंघात महत्त्वाची खेळी केली आहे. धैर्यशील माने आणि राजू शेट्टींना आव्हान देईल, अशा हाजी असलम बादशाह सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतात.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पराभूत केले होते. मात्र, 2022 च्या शिवसेनेतल्या बंडानंतर धैर्यशील माने बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे (शिंदे गट) पक्षात गेले. ठाकरेंनी आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पर्यायांची चाचपणी सुरू केली. त्यातच राजू शेट्टींना झटका देणाऱ्या हाजी असलम बादशाह सय्यद यांनी प्रवेश केल्याने ठाकरेंचा (Uddhav Thackeray) उमेदवाराचा शोध संपल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray News
Sanjay Pandey Grant Bail : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

माने यांनी शिंदे गटात प्रवेश गेल्यामुळे ठाकरे गटातून ही जागा कोण लढवणार अशी चर्चा सुरु झाली होती. अशातच त्या जागेवर स्वाभिमानी आणि ठाकरे एकत्रीत ऐवून शेट्टी उमेदवार असणार अशीही चर्चा रंगली होती. मात्र, त्या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला, असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरेंनी असा नेता आपल्या गटात घेतलाय ज्यांनी फक्त मानेंचीच नाही तर शेट्टींचीही डोकेदुखी वाढवली आहे.

2019 मध्ये शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा हातकणंगले लोकसभा मतदार संघातून विजय झाला. शेट्टींचा लाखभर मतांनी पराभव झाला होता. सय्यद यांनी हातकणंगले मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. पराभव जरी झाला असला, तरी त्यांना मिळालेली मते निर्णाय होती. ती मते राजु शेट्टींच्या पारड्यात जाणारी मते हाजी असलम बादशाह सय्यद यांच्याकडे वळली होती. माने यांना 5,85,776 मते मिळाली होती. राजू शेट्टी यांना 4 लाख 89,737 मते मिळाली होती. हाजी असलम बादशाह सय्यद यांना लोकसभा निवडणुकीत 1 लाख 23,419 मते मिळाली होती.

Uddhav Thackeray News
Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटलांची कमाल : भाजपला मिळवून दिले ऐतिहासिक यश

आता सय्यद यांना धैर्यशील मानेंविरोधात आमने-सामने लढवण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेतला जाऊ शकतो. माने टक्कर देण्यासाठी ठाकरे सय्यद यांना मैदानात उतरवणार का ते पहावे लागणार आहे. मात्र, हातकणंगले मतदारसंघातील समीणकरणे बदलणार हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com