.....तर गुलाम नबी आझाद आणि सिब्बलांचे भाजपमध्ये स्वागत करु : रामदास आठवले - Gulam Nabi Azad and Kapil Sibbal Should Join BJP Say Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

.....तर गुलाम नबी आझाद आणि सिब्बलांचे भाजपमध्ये स्वागत करु : रामदास आठवले

वृत्तसंस्था
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार आहे. जर कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी करण्याचे आरोप काँग्रेसमधून होत असतील तर या दोन्ही नेत्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमाणे पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य ठरेल, असे रामदास आठवले म्हणाले. 

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद आणि कपील सिब्बल यांनी काँग्रेसच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. जर राहुल गांधी त्यांच्यावर आरोप करत असतील तर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सोडावी, आम्ही भाजपमध्ये त्यांचे स्वागत करु, असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. 

पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार आहे. जर कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी करण्याचे आरोप काँग्रेसमधून होत असतील तर या दोन्ही नेत्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमाणे पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य ठरेल, असे आठवले म्हणाले. 

''काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून वाद सुरु आहेत. अशाच पक्षाच्या उभारणीसाठी झटलेल्या नेत्यांवर आरोप होत असतील तर अशा नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणे योग्य ठरेल. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर सचीन पायलटही काँग्रेस सोडणार होते. पण नंतर त्यांनी समझोता केला,'' असेही आठवले म्हणाले. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक नुकतीच झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. यात गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. 

काँग्रेसच्या नेतृत्वात बदलासाठी पत्र लिहणारे २३ नेते वादाच्या केंद्रस्थानी आले  आहेत. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना पक्षातूनच लक्ष्य केले जात आहे. यातील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. आझाद यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली त्यावेळी त्यांना केवळ ३२० मते मिळाली होती, असा टोला उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्याने काही दिवसांपूर्वी लगावला होता. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख