भाजपचं धक्कातंत्र : गुजरातचे मुख्यमंत्री रूपानी यांचा तडकाफडकी राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
gujarat chief minister vijay rupani resigns in a sudden move
gujarat chief minister vijay rupani resigns in a sudden move

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रुपानी यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा नसताना त्यांनी हे पाऊल उचलल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे भाजपचे (BJP) धक्कातंत्र मानले जात आहे. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन आज राजीनामा सोपवला. गांधीनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. 

यानंतर पत्रकारांशी बोलताना रूपानी यांनी अचानक राजीनामा देण्याचे कारण सांगण्यास नकार दिला. ते म्हणाले की, भाजप नेतृत्वाने मला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मी पाच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. भाजपममध्ये नेतृत्वबदल हा नैसर्गिकपणे होते असतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षासाठी काम करीत राहीन. मागील 5 वर्षांत राज्यातील जनतेने वारंवार भाजपवर विश्वास दाखवला आहे. 

रूपानी यांच्या जागी कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. पक्ष नवीन मुख्यमंत्री निवडेपर्यंत पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. याआधी भाजपशासित काही राज्यांमध्येही कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यात कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बी.एस.येडियुरप्पा यांना तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदावरुन तिरथसिंह रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com