गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनतर आता विधानसभा अध्यक्षांचाही तडकाफडकी राजीनामा

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होत असून, त्याआधी तासभर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी राजीनामा दिला आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनतर आता विधानसभा अध्यक्षांचाही तडकाफडकी राजीनामा
Gujarat assembly speaker rajendra trivedi submits resignation

गांधीनगर : विजय रूपानी (Vjay Rupani) यांनी गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आले आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होत असून, त्याआधी तासभर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी (Rajendra Trivedi) यांनी अचानक राजीनामा दिला आहे. 

गुजरातच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज होत आहे. या शपथविधीच्या तासभर आधी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, तो आजपासूनच लागू झाला आहे. त्रिवेदी यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नवीन मंत्रिमंडळाचा काल (ता.15) शपथविधी होणार होता. त्याआधीच भाजपमध्ये वाद उफाळला होता.  मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व मंत्रिमंडळात बदल हवा आहे. यामुळे अंतर्गत नाराजी वाढली आहे. सुमारे 90 टक्के मंत्र्यांना बदलले जाईल, अशी चर्चा आहे. केवळ एक ते दोन मंत्री नवीन मंत्रिमंडळात कायम राहतील, असे मानले जात आहे. यामुळे आधीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. यामुळे अखेर शपथविधीसाठी आजचा मुहूर्त निश्चित करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मंत्रिमंडळातून नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, आर.सी.फाल्दू आणि कौशिक पटेल यांच्यासाख्या बड्या नेत्यांना डच्चू दिला जाईल, अशी शक्यता आहे. नितीन पटेल हे आधी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे अर्थमंत्रिपद होते. भूपेंद्र चुडासामा हे शिक्षणमंत्री, आर.सी.फाल्दू कृषिमंत्री तर कौशिक पटेल महसूल मंत्री होते. हे चौघेही भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. या सर्वांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. 

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 21 ते 22 मंत्री असतील. आज त्यांचा शपथविधी होणार होता. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल आणि महिलांची संख्या वाढवली जाईल, अशी शक्यता आहे. यामुळे अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल. जातीय समीकरणांचा समतोल राखतानाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात विशेषकरून स्थान मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.  

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.