मोठी बातमी : 'लेडी सिंघम'च्या आत्महत्येप्रकरणी अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक रेड्डींचेही निलंबन - government suspends former Regional Director of Melghat Forest Reserve MS Reddy | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

मोठी बातमी : 'लेडी सिंघम'च्या आत्महत्येप्रकरणी अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक रेड्डींचेही निलंबन

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मार्च 2021

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी हरीसाल येथील शासकीय निवासात गोळी झाडून आत्महत्या केली होती. 

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी नुकतीच हरीसाल येथील शासकीय निवासात वरिष्ठाच्या छळाला कंटाळून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी अटक केली होती. तसेच, त्यांना निलंबितही करण्यात आले होते. आता सरकारने या प्रकरणी अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनाही निलंबित केले आहे. 

राज्य सरकारने सुरवातीला अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची फिल्ड डायरेक्टर पदावरुन उलबांगडी केली होती. रेड्डी यांना वन बल कार्यालयात तात्पुरती हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्यांना सरकारने निलंबित केले आहे. याआधी सरकारने विनोद शिवकुमार यांना गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक या पदावरून दूर केले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागचा तात्पुरता प्रभार सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार याच्याकडे सोपवण्यात आला होता.

दीपाली चव्हाण यांनी सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले होते. दीपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले होते. 

माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे, असे दीपाली चव्हाण यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिलं होतं. माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांभीर्याने घ्या, असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.  
  
शिवकुमार यांच्याकडे काही जणांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या. त्याची शहानिशा न करता शिवकुमार मला निंलबित करण्याची धमकी देत होते. माझ्याकडे तीन गावांच्या पूऩर्वसनाचे काम होते. या कामाविषयी माझी बाजू ते ऐकून न घेता. ते मला शिवीगाळ करीत होते. मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल येथे येत आहेत. मला खूप वाईट बोलतात. यांचा मला खूप मानसिक त्रास होत आहे, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे.   

रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्‍या आणि 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी नुकतीच हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय निवासात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

दीपाली चव्हाण या या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या मूळच्या मराठवाड्यातील रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख