राष्ट्रपती राजवटीवरून नाना पटोलेंनी उडवली भाजप नेत्यांची खिल्ली!

राष्ट्रपती राजवटीच्या विरोधकांच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही : नाना पटोले
Nana Patole

Nana Patole

Sarkarnama

मुंबई : भाजपचे काही लोक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करत आहेत. मात्र, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. लोकशाहीचे महत्व न मानणारे भाजपचे (bjp) नेते भ्रमित झाले आहेत. भ्रमित झालेल्या लोकांच्या तोंडाला फार लागायचं नसतं, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) यांनी भाजप नेत्यांची खिल्ली उडवली. (Government is not afraid of threats from opponents of President's regime: Nana Patole)

मिस्ड कॉल करा आणि गांधीदूत बना, अशी मोहिम काँग्रेसने राज्यात सुरू केली आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. त्यावेळी त्यांना राज्यपालांची शिफारस डावलून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती राज्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असती का, या प्रश्नावर पटोले यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात आहे; परंतु विरोधी पक्षांनी भ्रमात राहू नये. महाविकास आघाडीचे सरकार अशा धमक्यांना घाबरत नाही.

<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>
राज्यपालांचा अवमान होऊ नये म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलली!

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम राज्य सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकार आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये. विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले. कायद्याचा पेच निर्माण होऊ नये; म्हणून सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेणे टाळले. ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>
अजितदादांचे कौतुक करत नेतृत्व देण्याचं मुनगंटीवारांचे आदित्य ठाकरेंना साकडं

भारतीय जनता पक्षाने राज्यपालांच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळा आणला. कोरोनामुळे आतापर्यंत झालेली अधिवेशने कमी कालावधीची झाली होती त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक घेता आली नाही. यावेळी ती प्रक्रिया पूर्ण करता आली असती पण त्यात भाजपानेच अडथळा आणला. सरकारकडे १७४ चे बहुमत आहे त्यामुळे आवाजी मतदानावरून विरोधकांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, असेही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com