गोपीचंद पडळकरांनी दिले गृहमंत्री वळसे पाटलांना आव्हान!

मी जयंत पाटील यांची गाडी अडवली होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता.
Dilip Walse Patil

Dilip Walse Patil

Sarkarnama

मुंबई : देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना म्हणजे २०१४ पासून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा माझ्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या विधानसभेतील उत्तराला आव्हान दिले. (Gopichand Padalkar challenges Home Minister Dilip Walse Patil)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्यासंदर्भातील प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत’ असे म्हटले होते. गृहमंत्र्यांच्या त्या दाव्याला पडळकरांनी आज (ता. २९ डिसेंबर) आव्हान दिले.

<div class="paragraphs"><p>Dilip Walse Patil</p></div>
माझ्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार पडला अन्‌ तेव्हापासून माझ्यावर गुन्हे दाखल होऊ लागले

आमदार पडळकर म्हणाले की, विधानसभेत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले’ असे म्हटले होते. माझे वळसे पाटलांना आव्हान आहे की, २०१४ पासून २०१९ पर्यंत म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येईपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता. पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केले, त्यामुळे माझ्यावर गुन्हा नोंदविला. जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले म्हणून गुन्हा दाखल केला. सोलापुरातही असाचा गुन्हा दाखल केला. आटपाडी एसटी बस आागाराला कुलूप लावले म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्यावर गुन्हेगारीचा ठपका ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी सभागृहात केला आहे.

<div class="paragraphs"><p>Dilip Walse Patil</p></div>
‘गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावरून जानकरांच्या अंगावर गाडी घातली....’

तत्पूर्वी पडळकरांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, विधानपरिषदेत आपल्यावरील हल्ल्यासंदर्भातील प्रश्नावर गृहराज्यमंत्री देसाई यांनी राजकीय सूडबुद्धीने उत्तर दिले आहे. माझ्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि तेव्हापासून माझ्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी मी जयंत पाटील यांची गाडी अडवली होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. कऱ्हाडच्या टेंभूच्या कार्यालयात शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आंदोलन केले होते, त्यावेळी माझ्यावर ३५३ चा गुन्हा दाखल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com