भाजपची भूमिका आता पडळकर मांडणार; प्रवक्तेपदी नियुक्ती - gopichand padalkar appointed as spokesperson by bjp for western maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपची भूमिका आता पडळकर मांडणार; प्रवक्तेपदी नियुक्ती

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

भाजपने आगामी काळासाठी प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. भाजपने प्रवक्तेपदी आमदार गोपीचंद पडळकर यांना स्थान दिले आहे. 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळासाठी पक्षाचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून यापूर्वीच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज 10 प्रवक्ते व 33 चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे. 

मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये असून, उत्तर महाराष्ट्राची प्रवक्तेपदाची जबाबदारी खासदार भारती पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबईत राम कदम, भालचंद्र शिरसाट आणि अॅड. राहुल नार्वेकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भातील प्रवक्तेपदाची जबाबदारी शिवराय कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्तेपदाची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्यावर सोपविली आहे. पडळकर हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने मोठा गदारोळ उडाला होता. यावर पक्षाच्या नेत्यांची सावरासावर करताना दमछाक झाली आहे. आता आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या पडळकरांनाच भाजपने प्रवक्ता नेमून पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी दिली आहे. 

भाजपने पश्चिम महाराष्ट्रात पडळकर यांना प्रवक्तेपदी नेमतानाच मुंबईत आमदार राम कदम यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. कदम हेही कायम वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्ष अनेक वेळा अडचणीत आल्याचे प्रसंग निर्माण झाले होते. 

भाजपचे प्रवक्ते आणि चर्चा प्रतिनिधी खालीलप्रमाणे : 
मुख्य प्रवक्ता - केशव उपाध्ये 

प्रवक्ते –
खासदार भारती पवार, उत्तर महाराष्ट्र 
आ‍मदार गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र 
आमदार राम कदम, मुंबई 
शिवराय कुलकर्णी, विदर्भ
एजाज देखमुख, मराठवाडा 
भालचंद्र शिरसाट, मुंबई 
धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र 
राम कुलकर्णी, मराठवाडा 
श्वेता शालिनी, पुणे 
अॅड. राहुल नार्वेकर,  मुंबई

पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सदस्य -
गणेश हाके, अतुल शाह, आ.गिरीष व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ.अनिल बोंडे, आ.अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता परूळेकर, आ.सुरेश धस, प्रदीप पेशकार, आ.निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.
 
मीडिया सेल सदस्य - देवयानी खानखोजे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख