Konkan News : कदमांची दमछाक तर ठाकरेंना...; कोकणातील सभेच्या गर्दीचे तंत्र : स्थानिक गणित काय?

Uddhav Thackeray News : शिंदे गटात प्रवेश केलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांचा खेड हा मतदार संघ आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Eknath Shinde, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray and Eknath Shinde Konkan News : कोकणातील राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांनी ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांची पाच मार्चला खेडमधील गोळीबार मैदानावर सभा झाली. त्या सभेला माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार मैदानावर झालेल्या दोन्ही सभांना मोठी गर्दी होती. त्यामुळे कोकणात नेमके काय होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी प्रवेश केला. त्यांनी गर्दी जमवत विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. रामदास कदम (Ramdas Kadam) आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले. त्यानंतर रामदास कदम, आमदार योगेश यांनी रविवारी खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी भरपूर गर्दी जमवून उत्तम वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे या दोन्ही सभांच्या माध्यमातून कोकणातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Bhaskar Jadhav Vs Rane : नारायण राणेंची ती ऑफर मी ठामपणे नाकारली आणि... : भास्कर जाधवांनी सांगितली ती गोष्ट

शिंदे गटात प्रवेश केलेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे आमदार पुत्र योगेश कदम यांचा खेड हा मतदार संघ आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या सभेच्या माध्यमातून कोकणातील त्यांच्याशी निष्ठावान राहिलेल्या शिवसैनिकांना काय संदेश देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्या सभेत ठाकरे यांनी गद्दारीचा मुद्दा उपस्थित करत आगामी निवडणुकीत यांना संपवा, असा थेट आदेशच दिला. त्यामुळे डिवचले गेलेल्या रामदास कदम यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच ठिकाणी 'उत्तर सभा' होईल, असे जाहीर केले.

कोकणाने शिवसेनेला स्थापनेपासून मदत केली आहे. कोकणातील अनेक आमदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे आपली ताकद आणखी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी हजेरी लावली. अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून कदम पिता-पुत्रांनी सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली. ठाकरे यांच्या सभेप्रमाणे कदम यांच्या सभेला गर्दी होणार की नाही, अशी चर्चा होती. मात्र, कदम यांनी मोठी गर्दी जमवली, त्याची एकच चर्चा झाली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सभेला मोठ्याप्रमाणात गर्दी झाली. मात्र, गर्दी जमविण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तंत्र रामदास कदम यांना अवगत आहे. तालुक्यात त्यांचे चांगले नेटवर्क आहे. अर्थिक आणि राजकीय सत्ता त्यांच्याकडे आहे. त्याचा उपयोग त्यांनी अधिक गर्दी जमविण्यासाठी केला, असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी नोंदवले. रामदास कदम यांच्या तुलनेत संजय कदम यांच्याकडे अर्थिक आणि राजकीय सत्तेच्या मर्यादा आहेत. तरीही ठाकरे यांच्या सभेला चांगली गर्दी जमली होती, असे कामत यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Pankaja Munde : २५/१५ च्या निधीसाठी आता मंत्रालयात बेंचवर बसू का? पंकजा मुंडेंचा अगतिक सवाल

जाणकरांच्या मते दोन्ही सभांना समान गर्दी होती. मात्र, गर्दी जमा करताना कदम पिता-पुत्रांना चांगलीच ताकद लावाली लागली. त्यांच्या सोबतीला कोकणातील इतर आमदार आणि मंत्रीही होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात सभा झाली होती. त्या सभेचे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे रिकाम्या खुर्च्यांची चर्चा अधिक झाली होती. ती नामुष्की पुन्हा ओढवू नये, यासाठी शिंदे गटाच्या वतीनेही जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यांनी गर्दीचे पूर्ण नियोजन केले होते.

या सभेच्या माध्यमातून राज्यात एक नवा संदेशही देण्याचा शिंदेंचा प्रयत्न होता. ठाकरेंच्या इतकीच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त गर्दी आम्ही जमवू शकतो. त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट ही विरोधकांची अफवा आहे, आणि शिंदे गट व भाजपसाठीही राज्यात चांगले वातावरण आहे, असा मेसेज त्यांना द्यायचा होता. त्यातच आम्हीही कमी नाहीत, हे कदम पिता-पुत्रांना दाखवून द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली ताकद पणाला लावली. मात्र, रामदास कदम यांच्याकडे सगळी ताकद होती. त्यांनी ती वापरली आणि गर्दी जमा केली. तर दुसरीकडे संजय कमद आणि ठाकरे गटाची परिस्थिती नाजूक होती.

Eknath Shinde, Uddhav Thackeray News
Old Pension Scheme : कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; राज्य सरकारने काय दिली आश्वासने?

ही गर्दी जमवतांना कदम यांची काहीशी दमछाक झाली. मात्र, तुलनेने ठाकरेंच्या सभेलाही गर्दी जमवण्यात आली होती. पण त्यांच्याकडे कदम यांच्या तुलनेत ताकद कमीच होती. तरीही त्यांच्याकडेही गर्दी झाली. त्यामुळे कोकणातील नेते जरी शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या सोबत आहेत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे कोकणात शिंदेंना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर ठाकरेंना राहिलेल्या शिवसैनिकांना जपावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com