ईश्वर सातत्याने भाजपच्या बाजूने

सरकार दबावतंत्र वापरून काही करत असेल मात्र परमेश्वर हा सत्याच्याच बाजूने आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे (bjp) विठ्ठल भोसले यांची ईश्वरी चिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यानंतर बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी ईश्वर सातत्याने भारतीय जनता पक्षासोबतच आहे. सरकार दबावतंत्र वापरून काही करत असेल मात्र परमेश्वर हा सत्याच्याच बाजूने आहे, असा दावा केला आहे. (god consistently on the side of BJP : Praveen Darekar)

मुंबई बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार विठ्ठल भोसले आणि शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांना समसमान मते पडली. त्यानंतर ईश्वरी चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला, त्यात भोसले यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याआधारे दरेकर यांनी वरील दावा केला आहे.

Pravin Darekar
प्रश्न विचारायला नाही सोडवायला अक्कल लागते; चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांना टोला

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘महापालिकेत तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीने भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येसुद्धा ईश्वर चिठ्ठीचा कौल भाजपच्याच बाजूने लागला आहे. त्यामुळे जरी सरकार दबाव तंत्र वापरुन काही करत असेल, तरी परमेश्वर हा सत्याच्याच बाजूने आहे."

Pravin Darekar
नववर्षाच्या शुभेच्छा अन् तिळगुळाने खैरे-दानवे यांच्यात गोडवा निर्माण होणार ?

ईश्वरी संकेत हे भाजपच्या बाजूने आहेत, याचा प्रत्यय अनेक ठिकाणी आला आहे. केवळ एका मतामुळे आमचा मुंबई जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. अध्यक्षपदासाठीही चिठ्ठी काढायची वेळ आली असती तर त्या ठिकाणी भाजपचीच चिठ्ठी निघाली असती, असा दावाही प्रवीण दरेकर यांनी या वेळी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in