माजी मुख्यमंत्री राणेंना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री राणेंना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
BJP and Congress

BJP and Congress

Sarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. यातच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय राज्यातील भाजप (BJP) सरकारने घेतला आहे. राणेंनी त्यांचे पुत्र भाजप नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती.

याबद्दल बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले की, आमच्या सरकारने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना आजन्म मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. गोव्यातील सर्व स्तरातील जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहेत. राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असताना कायम त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलतानाच प्रतापसिंह राणे यांनी नुकताच निवृत्तीचा बॉम्ब टाकला होता. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. ते म्हणाले होते की, मी राजकारणात सुमारे 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आता मला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. मला आता वाटत आहे की मी आराम करून नव्या पिढीला संधी द्यावी. गोवा प्रगतीशील राज्य असून, तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

<div class="paragraphs"><p>BJP and Congress </p></div>
धक्कादायक : विमानातून उतरताच तब्बल 125 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा 21 डिसेंबरला केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पोरीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. प्रतापसिंह राणे हे 82 वर्षांचे असून, ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली होती.

<div class="paragraphs"><p>BJP and Congress </p></div>
हा तर मोदींचा चीप पब्लिसिटी स्टंट! राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली होती. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. आता राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com