शिवसेनेसमोर पेच; प्रमोद सावंतांनी बोलावलं पण मुख्यमंत्री ठाकरे जाणार का?

गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत पर्व सुरू होत असून त्यांच्या शपथविधीकडे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray and Pramod Sawant
Uddhav Thackeray and Pramod Sawant Sarkarnama

पणजी : गोव्यात (Goa) पुन्हा एकदा प्रमोद सावंत पर्व सुरू होत आहे. भाजप (BJP) नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सावंतांचा शपथविधी 28 मार्चला होत आहे. भव्यदिव्य अशा शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी सावंतांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) जाणार का, याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

शिवसेना गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरली होती. मात्र, पक्षाला या निवडणुकीत यश मिळाले नाही. यावरून महाराष्ट्रातील भाजप नेते सातत्याने शिवसेनेला डिवचताना दिसत आहेत. आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शपथविधीसाठी ठाकरेंना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री जाणार की नाही, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना सुरू होण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Uddhav Thackeray and Pramod Sawant
अखेर ठरलं! अखिलेश यादवांनी स्वीकारली मोठी जबाबदारी

भाजपने गोव्यात 20 जागा मिळवत पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट त्यांनी घेतली अन् मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ 666 मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण पक्ष नेतृत्वाने सावंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

Uddhav Thackeray and Pramod Sawant
राजकारण तापलं! कोल्हापूर उत्तरच्या एका उमेदवारासाठी भाजपचे चाळीस स्टार प्रचारक

गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि एल. मुरूगन यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते. या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विश्वजित राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सर्वांनी सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com