ग्लोबल टीचर पुरस्कार पटकावणाऱ्या डिसलेंची रिअॅक्शन झाली व्हायरल..!

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे सोलापूरमधील शिक्षक रणजितसिंह डिसले हे चर्चेत आले आहेत. त्यांची पुरस्कार मिळाल्यानंतरची प्रतिक्रिया व्हायरल होऊ लागली आहे.
global teacher awardee ranjitesinh disale absent in school for last 3 to 4  months
global teacher awardee ranjitesinh disale absent in school for last 3 to 4 months

मुंबई : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर अवार्ड' सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराचा मान प्रथमच डिसले यांच्या रूपाने भारताला मिळाला आहे. विशेष म्हणजे डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची त्यांची रिअॅक्शन सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

परितेवाडी (ता.माढा) येथील डिसले यांना हा सात कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. त्यावेळी डिसले हे आई-वडिलांसमवेत ऑनलाइन हा पुरस्कार सोहळा पाहत होते. त्यांच्या नावाची घोषणा होताच डिसले यांनी व्यक्त केलेल्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आगे.  

असा पुरस्कार मिळणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक असून ते सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांनी घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी विकसित केलेल्या क्‍यूआर कोड पद्धतीचा प्रथम महाराष्ट्र सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये वापर चालू केला आहे. त्यानंतर त्याची देशपातळीवर दखल घेऊन संपूर्ण भारतातील शालेय पुस्तकात त्यांच्या क्‍यूआर कोड पद्धतीचा वापर चालू झाला. हा शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठा क्रांतिकारक बदल समजला जातो. आता त्यांच्या याच क्‍यूआर कोड पद्धतीची जागतिक पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. 

या पुरस्कारासाठी 140 देशातील 12 हजाराहून अधिक शिक्षकांमधून प्रथम तीस शिक्षकांची आणि नंतर अंतिम दहा शिक्षकांची निवड करण्यात आली होती. त्या निवडलेल्या दहा शिक्षकांमधून अंतिम विजेता म्हणून रणजित डिसले यांचे नाव आज जाहीर करण्यात आले आहे. 

डिसले यांना सात कोटी रुपयांचा ग्लोबल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी लगेच एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे जाहीर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळा पायंडा पाडला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com