शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरीत आरक्षण द्या  : राजेनिंबाळकर  - Give education, job reservation to the children of farmers | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरीत आरक्षण द्या  : राजेनिंबाळकर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेत केली.

उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव मिळाला पाहिजे, शेतकरी रक्ताचे पाणी करुन शेतीमाल पिकवित असतो. त्यामुळे त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेत केली. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण द्या, अशी मागणीही त्यांनी संसदेत केली आहे.

कांदा खाणारा माणूस कधी आत्महत्या करीत नाही, कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आत्महत्तेची वेळ येत असल्याची भावना राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात व्यक्त केली.

लोकसभेच्या अधिवेशनात शेती उत्पादन, व्यापार, व वाणिज्य विधेयकामध्ये चर्चेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदवून विविध दुरुस्ती सुचवल्या. 
यावेळी खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला 2022 पर्यंत हमीभाव देण्याची घोषणा केली आहे, पण नुसत्या घोषणा करुन हे साध्य होऊ शकणार नाही. त्यासाठी सरकारने उपाययोजना राबवून त्यादृष्टीने पाऊले टाकणे अपेक्षित असल्याचे खासदार ओमराजे यानी सांगितले. 

शेतकऱ्यांना प्रामुख्याने आधारभूत किंमतीनुसार व्यापाऱ्यांनी शेती माल खरेदी करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षण देणे अत्यावश्यक बनले असल्याचीही मागणी त्यानी संसदेत केली. नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ खुली केल्याने निश्चितपणे त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पण यामध्ये लहान तथा अल्पभुधारक शेतकरी त्याचा माल इतर राज्याच्या बाजारपेठेत कसा घेऊन जाणार हा प्रश्न उपस्थित करुन खासदार ओमराजे यांनी बाहेर राज्यात शेती मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुक अनुदान देण्याची मागणी केली आहे. 

याशिवाय शेतकऱ्यांचा माल घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांची त्यांच्या बांधावर हजेरी लावल्याची अनेक उदाहरणे दिसतात पण पैसे देण्याची वेळ आल्यावर तो व्यापारीच गायब होतो, असे प्रकार पाहायला मिळतात. नवीन विधेयकामध्ये शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्याचे पेंमेट करण्याची बाब स्वागतार्ह असल्याचेही खासदार राजेनिंबाळकर यानी सांगितले. शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाराचे नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे, तसेच कांदा निर्यात बंदी उठवावी, ही प्रमुख मागणी यावेळी खासदार ओमराजे यानी केली. शेवटी त्यानी नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतमालाचे अनुदान शेतकऱ्यास देण्यासह इतरही दुरुस्त्या या विधेयकात सुचविल्या आहेत.

चिखली येथे शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनांनी चिखली मतदार संघातील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कांदा फेको आंदोलन केले. केंद्रात भाजप सरकार असून शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेत सरकारने कांदा निर्यात वर बंदी आणली आहे. त्यामुळे राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. पाऊस आणि कोरोना काळात बराच कांदा खराब झाला आहे. त्यातही नुकसान झाले आणि आता सरकारने निर्यात बंदी आणली आहे. त्यातही भाव पडले आहेत. त्यामुळे त्यांचे आथिर्क नुकसान होत असल्याने या निर्णयाला विरोध म्हणून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. चिखली येथे हि शेतकऱ्यांनी कांदा फेको आंदोलन केलं. तर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी हि केली आहे. 

 Edited  by : Mangesh Mahale 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख