मी राज्यसभेतून रिटायर झालोय पण राजकारणातून नाही; आझादांचे पुनरागमनाचे संकेत

जम्मू-काश्मीरमधील शांती संमेलनाला आज काँग्रेसमधील जी-23 नेत्यांनी हजेरी लावली.
ghulam nabi azad says he is retired from rajya sabha but not from politics
ghulam nabi azad says he is retired from rajya sabha but not from politics

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. मी राज्यसभेतून निवृत्त झालोय पण राजकारणातून निवृत्त झालो नाही, असे आझाद यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर संसदेतून मी पहिल्यांदाच रिटायर झालो नाही, असे सूचक वक्तव्य करीत त्यांनी पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. 

काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. 

आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर 'जी-23' नेत्यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षाला आठवण करुन दिली आहे. यासाठी निमित्त होते जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित शांती संमेलनाचे. या संमेलनाला कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी, राज बब्बर आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. 

शांती संमेलनात बोलताना आझाद यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत खुलासा केला. त्यांनी पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, मी राज्यसभेतून निवृत्त झालो असून, राजकारणातून निवृत्त झालो नाही. तसेच, मी संसदेतून आता पहिल्यांदाच निवृत्त झालो नाही. 

जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून टाकल्याबद्दल आझाद म्हणाले की, आज अनेक वर्षांनंतर आमची राज्य अशी ओळख नाही. आमची ओळखच नष्ट करण्यात आली आहे. राज्याचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी माझी संसदेत आणि संसदेबाहेर लढाई सुरूच राहील. जोपर्यंत येथून निवडून आलेले उमेदवार मंत्री आणि मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत बेरोजगारी, रस्ते आणि शाळांची स्थिती सुधारणार नाही. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com