धक्कादायक : देशाच्या सीमेवर वापरल्या जाणाऱ्या 'लाईट मशिन गन्स'चा आसाम-मिझोराम सीमेवर वापर

आसाम व मिझोराम सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला आहे.
gaurav gogoi says lmg used in assam and mizoram border clash
gaurav gogoi says lmg used in assam and mizoram border clash

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात लाईट मशिन गनचा (LMG) वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यामुळे हा दोन राज्यातील संघर्षात या एलमजीचा वापर कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.  

आसाम-मिझोराम सीमेवरील संघर्षाचे पडसाद संसदेत उमटले आहेत. काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी या प्रश्नी चर्चा करण्यासाठी लोकसभेत सूचना केली आहे. ते म्हणाले की, आसाम-मिझोराम सीमेवरील संघर्षात एलएमजीचा वापर झाल्याचे वृत्त आहे. आपण देशाच्या अंतर्गत सीमांवर आहोत की देशाच्या बाह्य सीमांवर? आम्ही या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. 

गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील कोचर, हेलकांडी आणि करीममंग या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

शहा हे दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत परतले आहेत. त्यानंतर लगेचच दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव वाढला आहे. सोमवारी (ता.26) मिझोराममधील एका दाम्पत्यावर आसाममधील काही गुंडांनी हल्ला केल्याचे ट्विट मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केलं होतं. त्यानंतर हा वाद आणखी वाढत गेला. दोन्ही बाजूने पोलिस व नागरिकांनी जोरदार दगडफेक केल्याचे वृत्त आहे. तसेच दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याचेही सांगितले जात आहे. 

अजूनही सीमेजवळील जंगलात लपून बसलेल्या आसाममधील एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. काचारचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. आसामचे मुख्यमत्री हिमंता बिस्व सरमा यांनी ट्विट करून सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा या हिंसाचारात मृत्यू झाल्याची माहिती दिली. सीमेचे संरक्षण करताना सहा शूर पोलिसांनी बलिदान दिल्याचं सरमा यांनी म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com