काँग्रेस लोकसभेच्या उपनेतेपदी गैारव गोगई  - Gairav ​​Gogai as Congress Lok Sabha Deputy Leader | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस लोकसभेच्या उपनेतेपदी गैारव गोगई 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

37 वर्षीय गैारव गोगई हे काँग्रेसमधील युवा नेतृत्व आहे. आसामधील कलिएबोर येथून ते निवडून आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संसदेतील कामकाजासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. काँग्रेसने गैारव गोगई यांची लोकसभेच्या उपनेतेपदी निवड केली आहे. 37 वर्षीय गैारव गोगई हे काँग्रेसमधील युवा नेतृत्व आहे. आसामधील कलिएबोर येथून ते निवडून आले आहेत.

गैारव गोगई हे इंजिनिअर असून  ते आसामचे माजी मु्ख्यमंत्री तरूण गोगई यांचे पुत्र आहेत. त्यांनी काही काळ एअरटेल कंपनीत काम केले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील एका स्वंयसेवी संस्थेत काम करत होते. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडणूक आले.  
 
काँग्रेसमधील वरिष्ठ नेता असलेले मनीष तिवारी, शशि थरूर यांना बाजूला करून गैारव गोगई यांची लोकसभेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अन्य पाच सदस्यामध्ये अधीर रंजन चौधरी, के सुरेश, गौरव गोगोई, रवनीत सिंह बिट्टू आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. 

संसदेतील विविध विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने 10 खासदारांचा एक गट तयार केला आहे. यात राज्यसभेचे नेते, उपनेते, लोकसभेतील काही सदस्यांचा समावेश आहे. अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल हेही अऩ्य दोन सदस्य आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसने आपल्या संसदेतील पक्षाच्या कामकाजात काही फेरबदल केले आहे. सध्या काँग्रेस आपल्या अंतर्गत वादात आहेत. पक्षातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे या रिक्त जागावर नियुक्ती केली जात आहे. 

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून कमी पडू नये, म्हणून काँग्रेस तयारी करत आहे. 
 Edited  by : Mangesh Mahale  

 

हेही वाचा : सैयद जफर इस्लाम बनणार भाजपचे सहावे मुस्लिम खासदार  

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने आपले राष्ट्रीय प्रवक्ते व एअर इंडियाचे संचालक सैयद जफर इस्लाम यांना उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मैदानात उतरविले आहे. ते विजयी होणे जवळपास नक्की मानले जाते. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपच्या गळाला लावण्यात इस्लाम यांनी बजावलेल्या कळीच्या भूमिकेचे बक्षीस त्यांना मिळाल्याचे मानले जाते. सैयद जफर इस्लाम विजयी झाल्यास जनसंघानंतर राजकीय पक्ष बनलेल्या भाजपचे गेल्या चार दशकांतील ते केवळ सहावे मुस्लिम खासदार ठरतील. सध्या भाजपच्या सुमारे 390 खासदारांपैकी राज्यसभेतून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे एकमेव शिया मुस्लिम खासदार आहेत. भाजपच्या संपूर्ण इतिहासात ज्येष्ठ नेत्या नजमा हेप्तुल्ला यांच्यासह नक़वी, सिकंदर बख्त (राज्यसभा) तसेच शहनवाज़ हुसेन व आरिफ बेग (लोकसभा) हे पाचच मुस्लिम नेते खासदार झाले आहेत.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख