पवार - गडाख यांच्या जुन्या संबंधांमुळे शंकरराव गडाखांच्या पंखात बळ...

पवार - गडाख यांच्या जुन्या संबंधांमुळे शंकरराव गडाखांच्या पंखात बळ...

नगर : शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करून भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना आव्हान दिले. राष्ट्रवादीनेही गडाख यांना पाठिंबा देऊन पवार व गडाख कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध घट्ट असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे ज्येष्ठांचे हे मित्रत्त्वाचे नाते गडाख यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची मैत्री सर्वश्रृत आहे. गडाखांचे पुत्र माजी आमदार शंकरराव गडाख यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कोण उमेदवार देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. उमेदवार कोणताही असला, तरी पक्षाचे बहुतेक कार्यकर्ते गडाख यांना मानणारे होते. त्यामुळे गडाख यांचे पारडे जड राहिल, हे निश्‍चित होते. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारीसाठी जोरदार ताकद लावली होती. ऐनवेळी पवार-गडाख कुटुंबाची मैत्री कामे आली. पक्षाने गडाख यांनाच पाठिंबा जाहीर करून त्यांच्या पंखात ताकद दिली. त्यामुळे आता मुरकुटे विरुद्ध गडाख अशी लढत निश्‍चित झाली आहे. 

घुलेंची साथ मोलाची 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख यांचेही मैत्रीचे संबंध आहेत. आज तेही संबंध येथे कामी आले आहेत. घुले यांनी यापूर्वीच निवडणूक न लढण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पक्ष सांगेन ती भूमिका घेण्यास ते तयार होते. पक्षाने गडाखांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे नेवासे विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा स्वतंत्र उमेदवार राहणार नाही. त्यात गडाख यांनीही काल बोलताना घुले यांची आपल्याला साथ असल्याचे सांगून गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे घुले कुटुंबियांची साथ गडाख यांना मोलाची ठरणार आहे. 

गडाख यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा : फाळके 
नेवासे विधानसभा मतदारसंघात शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला असून, पक्षाची ताकद तेथे गडाख यांच्या मागे असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी "सरकारनामा" शी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com