काँग्रेसचा बडा नेता विरोधी पक्षात प्रवेश करण्याच्या काही तास आधीच पडला आजारी

काँग्रेसच्या बड्या नेत्याने विरोधी पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले होते.
former congress mla ashwanhi sekhri admitted in hospital
former congress mla ashwanhi sekhri admitted in hospital

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील  (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच माजी मंत्री व ज्येष्ठ नेते अश्वनी सेखडी (Ashwani Sekhri) यांनी विरोधी पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलात (Shiromani Akali Dal) प्रवेश करण्याची घोषणा केली होती. परंतु, प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या काही तास आधी प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात दाखल झाले. यामुळे ते काँग्रेसमध्येच राहण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सेखडी यांनी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेखडी यांच्या अकाली दलातील प्रवेशाचा जंगी कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमासाठी मोठा मंचही उभारण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी सेखडी हे प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने सेखडी यांचे मन वळविल्याचे आता समोर येऊ लागले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेखडी हे काँग्रेस सोडणार असे कळताच पक्षाचे नेते राजकुमार वेर्का हे त्यांच्या भेटीला गेले होते. त्यांनी सेखडी यांची समजूत काढली. याचबरोबर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सेखडी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सेखडी सच्चे काँग्रेसी असून, ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहतील, अशी शक्यता आहे. 

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. सिद्धू हे दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मागील अनेक दिवसांपासून सिद्धू हे पक्षनेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही पक्ष नेतृत्वाने भेट दिलेली नाही. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली आहे. 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com