मुंडे प्रकरणाला नवीन वळण : रेणू शर्माविरोधात भाजपच्या माजी आमदाराची पोलिसांकडे धाव - former bjp mla krishna hegde registers police complaint against renu sharma | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुंडे प्रकरणाला नवीन वळण : रेणू शर्माविरोधात भाजपच्या माजी आमदाराची पोलिसांकडे धाव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजयु मंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असून, यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. भाजपसह इतर विरोधी पक्षांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आता भाजपच्या माजी आमदाराने रेणू शर्मांविरोधात गंभीर आरोप करीत पोलिसांकडे धाव घेतली आहे. 

रेणू शर्मा हिने धनंजय मुंडेंच्या विरोधात बलात्काराची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणी रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा  हिच्याशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपसह इतर विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी कारवाई करण्याचे टाळले असून, हा ब्लॅकमेलचा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.

आता भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मांवर गंभीर आरोप करीत पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यांनी अंधेरी पश्चिमेकडील आंबोली पोलिसांकडे रेणू शर्मांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, रेणू शर्मा ही महिला हनीट्रॅप लावून प्रतिष्ठित व्यक्तींना आपल्या जाळ्यात खेचून घेते. नंतर त्यांना ती ब्लॅकमेल करते. रेणू शर्मा मला 2010 पासून फोन आणि मेसेज करीत होती. तिने काही काळ माझा पाठलागही केला होता. तिच्याशी संबंध ठेवावेत यासाठी ती माझ्या मागे लागली होती. मी तिची संपूर्ण माहिती काढली असता ती अशा प्रकारे जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करते हे मला समजले होते. त्यामुळे मी तिला भेटण्याचे टाळले. 

धनंजय मुंडेंना तिने लक्ष्य केल्याचे समजताच मला धक्काच बसला. तेव्हाच मी तिच्याविरोधात पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी माझ्यावरही हीच वेळ आली असती, असेही हेगडेंनी म्हटले आहे. रेणू शर्मांवर तत्काळ गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी आणि तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे. हेगडे यांच्या तक्रारीनंतर रेणू शर्मांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. 

रेणू शर्मा यांनी डी.एन. नगर पोलीस ठाण्याला 14 जानेवारीला भेट दिली होती. या वेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्तांसमोर जबाब नोंदविला होता. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी उपस्थित होते. रेणू शर्मा यांनी आधी ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले  होते की, बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा मुंडेंशी परिचय झाला होता. बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये मी एकटीच घरी असताना मुंडे आले होता. ते रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन ते लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्यांनी याचा व्हिडीओही तयार केला होता. 

मुंडे नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होते. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्यांनी दिले होते. अशा प्रकारे ते माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होते, असे रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले होते.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख