विश्वचषक फुटबॉल : ट्रम्प, मोदींकडून फ्रान्सचे अभिनंदन

फुटबॉल विश्वचषकावर वीस वर्षांनंतर आज मोहोर उठवणाऱ्या फान्सच्या खेळाडूंचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी अभिनंदन केले आहे.
विश्वचषक फुटबॉल : ट्रम्प, मोदींकडून फ्रान्सचे अभिनंदन

पुणे : फुटबॉल विश्वचषकावर वीस वर्षांनंतर आज मोहोर उठवणाऱ्या फान्सच्या खेळाडूंचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी अभिनंदन केले आहे.
 
फ्रान्सचे अध्यक्ष इम्मॅन्युअल मॅकरॉन खेळाडूंना प्रोत्सहन देण्यासाठी स्वतः मॉस्कोतील आजच्या सामन्याला जातीने हजर होते. 

`उत्तम सामना' असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या फुटबॉलपटूंचे अभिनंदन केले आहे. विश्वचषकाच्या सर्व सामन्यांमध्ये; तसेच आजच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या टीमने उत्तम कामगिरी केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. फ्रॉन्सचे अभिनंदन करतानाच मोदी यांनी क्रोएशियाच्या खेळाडूंचेही अभिनंदन केले आहे. क्रोएशियानेही विश्वचषकांच्या सामन्यांमध्ये एेतिहासिक खेळ केला, असे त्यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सच्या आजच्या खेळाचे वर्णन `अतिउत्कृष्ट' असे केले आहे. विश्वचषकाच्या सामन्यांच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल रशिया आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचेही अभिनंदन करण्यास ट्रम्प विसरलेले नाहीत. 

पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी गंमतीशीर ट्विट करीत फ्रान्सचे अभिनंदन केले आहे. पूर्वी पुदुचेरी फ्रान्सच्या अख्यात्यारित होते. याचा हवाला देऊन `आम्ही विश्वचषक जिंकला. मित्रांनो अभिनंदन' असे ट्विट त्यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 
ज्योतिरादित्य सिंधिया, प्रफुल्ल पटेल, आदित्य ठाकरे, किरण खेर, प्रिती गांधी आदी राजकीय नेत्यांनीही फ्रान्सच्या फुटबॉलपटूंचे अभिनंदन केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com